शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

पाच राज्यांच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून केलेला अर्थसंकल्प : खासदार ॲड. राजीव सातव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:55 IST

सातव म्हणाले की, या अर्थसंकल्पात केरळ, तामिळनाडू, आसाम या राज्यांत केंद्र गुंतवणूक करणार असल्याचे जाहीर केले. मात्र देशाच्या अर्थव्यवस्थेचा ...

सातव म्हणाले की, या अर्थसंकल्पात केरळ, तामिळनाडू, आसाम या राज्यांत केंद्र गुंतवणूक करणार असल्याचे जाहीर केले. मात्र देशाच्या अर्थव्यवस्थेचा डालाेरा सांभाळणाऱ्या महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक कधी केली जाणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. पूर्ण अर्थसंकल्पात संरक्षण विभागाबाबत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एक शब्दही काढला नाही. एकीकडे चीन देशात घुसखोरी करीत आहे. संरक्षण विभागासाठी खर्चाचे बजेट वाढविणे आवश्‍यक होते, मात्र त्या पद्धतीने वाढविण्यात आलेले नाही.

याशिवाय बेरोजगारी वाढली असून, रोजगारवाढीसाठी या अर्थसंकल्पात काहीही स्पष्ट करण्यात आलेले नाही. अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्र्यांनी तीन वर्षांत, पाच वर्षांत कामे करणार हे सांगितले; मात्र यावर्षी काय करणार हे त्यांनी स्पष्ट केले नाही. त्यामुळे हा अर्थसंकल्प सेन्सलेस असल्याचा आरोप खासदार सातव यांनी केला आहे. आरोग्यावर २ लाख ३८ हजार कोटी रुपये खर्च करणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र हा निधी किती वर्षांत खर्च केला जाणार हे सांगण्यात आलेले नाही. एकीकडे शेतीचे उत्पन्न पाच वर्षांत दुप्पट करण्याचे केंद्राने सांगितले होते, मात्र आता त्याबाबत चर्चा केली जात नाही. काँग्रेसने मागील साठ वर्षांत एलआयसी उभी केली, बीपीसीएल उभी केली. मात्र बंदरे खासगीकरण करण्याचा अजेेंडा या अर्थसंकल्पात आहे. अदानी आणि अंबानी यांचे भले करण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पात झाले आहे.

नाशिक अन‌् नागपूर मेट्रोबाबतचे काम सुरू आहे. मात्र बाकीच्या विकासाबाबत काय आहे, इतर राज्यांत ज्याप्रमाणे मदत केली जाते त्याचप्रमाणे महाराष्ट्रात का मदत करण्यात आली नाही, राज्यातील सन २०२४च्या विधानसभेच्या वेळी राज्याला मदत करणार का, असा सवाल खासदार ॲड. सातव यांनी उपस्थित केला.