शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

पेपर तपासणीवर बहिष्कार कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 00:43 IST

विविध मागण्यांसाठी जुक्टा संघटनेच्या वतीने बारावीच्या पेपर तपासणीवर बहिष्कार कायम असून मागण्या मान्य होईपर्यंत बहिष्कार कायमच राहणार असल्याची माहिती जुक्टा संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. गजानन असोलेकर यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्ककळमनुरी : विविध मागण्यांसाठी जुक्टा संघटनेच्या वतीने बारावीच्या पेपर तपासणीवर बहिष्कार कायम असून मागण्या मान्य होईपर्यंत बहिष्कार कायमच राहणार असल्याची माहिती जुक्टा संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. गजानन असोलेकर यांनी दिली.बारावीच्या परीक्षांना २१ फेब्रुवारीपासून सुरूवात झाली. एकही उत्तरपत्रिका तपासली गेली नसल्याचे प्रा. असोलेकर यांनी सांगितले. जुनी पेन्शन योजना लागू करावी, मूल्यांकन पात्र शाळांना २० टक्के पेन्शन योजना लागू करावी, मूल्यांकन पात्र शाळांना २० टक्के अनुदान द्यावे, २ मे २०१२ नंतर नियुक्त शिक्षकांना मान्यता व वेतन द्यावे, २००३ ते २०१० पर्यंतच्या मंजूर वाढीव पदावरील शिक्षकांसाठी तरतुदी करावी, यासह ३२ मागण्यांसाठी उतरपत्रीका तपासणीवर बहिष्कार कायम आहे. संघटनेच्या वतीने १८ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून २ फेब्रुवारी रोजी राज्यभर एक दिवस लाक्षणिक बंद पाळला.शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी १५ दिवसात मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आले होते. आश्वासनाची पुर्तता न झाल्याने उतरपत्रीका तपासणीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय संघटनेने घेतला. मंडळाने घेतलेल्या मुख्य नियामक व नियामकाच्या बैठकांना कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी दांडी मारली. परीक्षा झालेल्या विषयाच्या उत्तरपत्रिका प्राचार्याकडे पडून आहेत.त्यामुळे यावर्षी १२ वीचा निकाल लांबण्याची शक्यता आहे. मागण्या मान्य होईपर्यंत बहिष्कार कायमच राहणार असल्याचा पावित्रा संघटनेने घेतला आहे. राज्यभर बहिष्कार टाकण्यात आला असून संघटनेचे जवळपास ७० हजार पदाधिकारी यात सहभागी झाले आहेत, असे संघटनेतर्फे सांगण्यात आले.