शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

पुरात वाहून गेलेल्या विद्यार्थिनीचा मृतदेह १२ तासांनंतर सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 07:17 IST

ओढ्याला आलेल्या पुरात वाहून गेलेल्या विद्यार्थिनीचा मृतदेह शनिवारी रात्री दोनच्या सुमारास डिग्रस शिवारातील वाघबेट शिवारात आढळून आला

डिग्रस क-हाळे (जि. हिंगोली) : हिंगोली तालुक्यातील लोहगाव येथे ओढ्याला आलेल्या पुरात वाहून गेलेल्या विद्यार्थिनीचा मृतदेह शनिवारी रात्री दोनच्या सुमारास डिग्रस शिवारातील वाघबेट शिवारात आढळून आला. मृतदेह दिसताच आईने हंबरडा फोडला. द्रोपदा रामा बोखाडे (१८) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.ती नुकतीच बारावी पास झाल्याने पुढील प्रवेश घेण्यासाठी हिंगोली येथे गेली होती. तेथून परत आल्यानंतर ती आपली मैत्रीन मंगल साहेबराव बोडखेसोबत शेतात वास्तव्यास असलेल्या आई- वडिलाकडे जात होती. ओढा ओलांडताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढला. यात द्रोपदाचा तोल गेला व ती पाण्याच्या प्रवाहासोबत वाहत गेली. मैत्रीण मात्र एका झुडपाच्या फांदीला पकडून राहिली व ती कसीतरी बाहेर निघाली. तिने गावात जाऊन सांगितल्यानंतर ही घटना उघडकीस आली. ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेऊन शोधकार्य सुरु केले. मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने शोधकार्य थांबवावे लागले. पाण्याचा प्रवाह कमी झाल्यानंतर रात्री एक वाजता पुन्हा शोधकार्य सुरु केले असता रात्री २. ३०च्या सुमारास डिग्रस कºहाळे परिसरातील वाघबेट शिवारात द्रोपदाचा मृतदेह एका वाळूच्या ढिगाऱ्यावर आढळून आला. शवविच्छदन करुन प्रेत नातेवाईकांच्या स्वाधिन केले.मृतदेह सापडताच आईने हंबरडा फोडलापाण्याचा प्रवाह वाढल्याने शनिवारी रात्री तिचा शोध घेण्याचे काम थांबविण्यात आले. पाण्याचा प्रवाह कमी होण्याचे नाव घेत नव्हता. नातेवाईक तो कमी होण्याच्या प्रतीक्षेत ओढ्याच्या काठी बसून होते. प्रवाह कमी झाल्यानंतर मध्यरात्री एक वाजता पुन्हा शोध मोहीम हाती घेण्यात आली. तब्बल दीड तासाने विद्यार्थिनीचा मृतदेह सापडला. मृतदेह सापडताच आईने हांबरडा फोडला.