शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सेनगावात भाजप कार्यालयावर दगडफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 00:13 IST

मराठा समाजाला राज्य शासनाने तातडीने आरक्षण जाहीर करावे, आंदोलनादरम्यान समाज बांधवांवर दाखल करण्यात आलेले गंभीर गुन्हे तातडीने रद्द करावे, या मागणीसाठी सकल मराठा समाजाचे आंदोलन शनिवारी शहरात कायम होते. यादरम्यान शहर बंद करून चार तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तर काही ठिकाणी दगडफेक करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कसेनगाव : मराठा समाजाला राज्य शासनाने तातडीने आरक्षण जाहीर करावे, आंदोलनादरम्यान समाज बांधवांवर दाखल करण्यात आलेले गंभीर गुन्हे तातडीने रद्द करावे, या मागणीसाठी सकल मराठा समाजाचे आंदोलन शनिवारी शहरात कायम होते. यादरम्यान शहर बंद करून चार तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तर काही ठिकाणी दगडफेक करण्यात आली.तालुक्यातील मराठा समाज आरक्षणाचा प्रश्नावर आक्रमक झाला आहे. मागील आठ दिवसांपासून शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात आरक्षण देण्याच्या मागणीसाठी विविध ठिकाणी आंदोलन केले जात आहे. शुक्रवारी येथील पंचायत समिती कार्यालयात गटविकास अधिकाऱ्यांच्या कक्षाला आग लावण्यात आली होती. या प्रकरणात शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संदेश देशमुखसह अन्य मराठा युवकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकारानंतर शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले. मराठा समाजाला तातडीने आरक्षण द्यावे, आदोंलनकर्त्यावर दाखल गुन्हे त्वरित मागे घेण्यात यावे, या मागण्यांसाठी २८ जुलै रोजी सकाळी शहर बंदचे आवाहन करण्यात आले.शहरातील सर्व दुकाने, शाळा, महाविद्यालये बंद करून शासनाबद्दल रोष व्यक्त केला. यावेळी काही तरुणांनी आमदार तानाजी मुटकुळे यांच्या संपर्क कार्यालयावर, बँक आॅफ इंडियाच्या एटीएमवर दगडफेक केली. त्यानंतर जमावाने आपला मोर्चा सेनगाव-जिंतूर रस्त्याकडे वळवला. येथील टी पॉर्इंटवर सकाळी दहा ते एक दरम्यान रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या रास्ता रोकोने मोठ्या प्रमाणात वाहतूक विस्कळीत झाली. आंदोलनकर्ते तरुण रास्ता रोको मागे घेत नसल्याने पोलिसांनी त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. त्यांचे समाधान करीत त्यांच्या भावना शासनापर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन दिले. यावेळी पन्नासहून अधिक आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेवून सोडून दिले. त्यानंतर आंदोलनाचा समारोप झाला.वाई गोरखनाथ येथे रास्ता रोको आंदोलन४आंबा चोंढी - वसमत- औंढा महामार्गावरील वाई फाटा येथे सकल मराठा समाजातर्फे मराठा आरक्षणासाठी रस्तारोको केला. आंदोलनात आंबा चौंढी, वाई, जुनूना, बहिरोबा चौंढी, येथील मराठा समाजाच्या बांधवांचा सहभाग होता. शांतेत आंदोलन पारपडले. मराठा आरक्षणाच्या बाबतीत राज्यसरकार तातडीने निर्णय न घेतल्याने सरकारच्या व मुख्यमंत्र्यांच्या कारभारावर आंदोलकांनी तिव्र भावना व्यक्त केले. यावेळी आरक्षणाच्या मागणीसह विविध मागणीचे निवेदन तहसीलदार ज्योती पवार यांना सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आले.माळहिवरा येथेही रास्ता रोकोहिंगोली : कनेरगाव या राष्टÑीय महामार्गावर असलेल्या माळहिवरा फाट्यावर आज सकाळी १० वाजता माळहिवरा व परिसरातील मराठा समाजाचे सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने जमवून मुख्य राष्टÑीय मार्गावरील रस्ता रोको आंदोलन करून टायर जाळून सरकार विरोधात घोषणा दिल्या.यावेळी दोन्ही बाजुंनी येणारी-जाणारी वाहने थांबविण्यात आली. कोणतीही अनुचित घटना घडली नाही. यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. सिद्धेश्वर भोरे, गुन्हा अन्वेशन शाखेचे भांडारवर, ग्रामीणचे मारोती थोरात, गोरेगावचे सपोनि माधव कोरटलू व शहर वाहतूक कर्मचारी उपस्थित होते.तसेच पोलीस कर्मचारी होते विशेष म्हणजे हिंगोली ते कनेरगाव या राष्टÑीय महामार्गावरील सर्व फाट्यावर पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात होता.

टॅग्स :HingoliहिंगोलीMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा