शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

अनुदान घेण्यास लाभार्थ्यांच्या रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 01:06 IST

येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेत संजय गांधी निराधार योजना, श्रावनबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेसह इतर योजनेंतर्गत जमा झालेले अनुदान घेण्यासाठी बँक परिसरात सकाळी ९ वाजेपासूनच वयोवृद्ध लाभार्थ्यांनी तहान-भुकेची पर्वा न करता रांगा लावल्या होत्या.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेत संजय गांधी निराधार योजना, श्रावनबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेसह इतर योजनेंतर्गत जमा झालेले अनुदान घेण्यासाठी बँक परिसरात सकाळी ९ वाजेपासूनच वयोवृद्ध लाभार्थ्यांनी तहान-भुकेची पर्वा न करता रांगा लावल्या होत्या. दरम्यान, एका महिलेला चक्कर आल्याने प्रसंगावधान राखात शाखा व्यस्थापकांनी तिचे अनुदान देऊन नागरिकांच्या मदतीने तिला उपचारासाठी पाठवून दिले.विशेष सहाय्य योजनेंतर्गत लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा झालेले अनुदान घेण्यासाठी वयोवृद्ध लाभार्थ्यांची मोठी हेळसांड होत आहे. निधी येण्यास विलंब होत असल्याने प्रत्येक महिन्याला टाकावे लागणारे अनुदान तीन - तीन महिन्याला टाकले जात आहे. ते अनुदान घेण्यासाठी लाभार्थी मात्र एकच घाई करीत आहेत. काही- काही लाभार्थ्यांना तर या ठिकाणी साधे उभेही राहता येत नाही. त्यातच सोबत कोणीच नसल्याचेही चित्र असते. मागील काही वर्षांपूर्वी एक ते दोन वयोवृद्ध लाभार्थ्यांचा या ठिकाणी मृत्यूही झाल्याचे रांगेत उभे असलेले लाभार्थी सांगत होते.एकतर लाभार्थीसंख्या मोठी अन् त्यातच या ठिकाणी लाभार्थ्यांना साधी पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था नाही. तहान व भुक लागलेली असतानाही केवळ क्रमांक जाईल किंवा मानधन घेऊन जाण्यासाठी बँक कर्मचारी आवाज देईल म्हणून अनेक महिला जागेवरच्या हलतसुद्धा नाहीत.हिंगोली तालुक्यात एकूण ११ हजार ३७४ लाभार्थ्यांची संख्या आहे. यामध्ये संयज गांधी निराधार योजनेत २५१६, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेत ५ हजार ८०८ तर इंदिरा गांधी राष्टÑीय वृद्धापकाळ योजनेत २ हजार ८८६, इंदिरा गांधी राष्टÑीय विधवा निवृत्ती वेतन योजनेत १५१, अपंग निवृत्ती योजनेत ८ आणि अर्थसहाय्य लाभ योजनेत ५ अशी लाभार्थी संख्या आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीBanking Sectorबँकिंग क्षेत्र