शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

व्यसनाधीन मुलाची हत्या करून पित्याने व भावाने रचला आत्महत्येचा बनाव 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 12:05 IST

दांडेगाव शिवारातील विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याच्या घटनेला कलाटणी मिळाली असून हा खून असल्याचे स्पष्ट झाले आहे.  पोलिस तपासानंतर मयत बंडू नारायण डाढाळे याची हत्या त्याच्या वडिलांनी व भावांनी मिळून केल्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी बाळापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आखाडा बाळापूर ( हिंगोली), दि. 15 : दांडेगाव शिवारातील विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याच्या घटनेला कलाटणी मिळाली असून हा खून असल्याचे स्पष्ट झाले आहे.  पोलिस तपासानंतर मयत बंडू नारायण डाढाळे याची हत्या त्याच्या वडिलांनी व भावांनी मिळून केल्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी बाळापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी सविस्तर वृत्त असे की ,कळमनुरी तालुक्यातील दांडेगाव शिवारातील आखाड्यावर बंडू डाढाळे (वय-२२) रा.पार्डी ता.वसमत याचा मृत्यू झाला. या प्रकरणी कुरूंदा पोलीस ठाण्यात बंडू यांनी आजारपणास कंटाळून आत्महत्या केल्याच्या  माहितीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. परंतु, घटनास्थळ बाळापूर पोलीस ठाण्याचे हद्दीत असल्याने ते तपासासाठी बाळापुर ठाण्याकडे वर्ग झाले. 

बीट जमादार तुळशीराम गुहाडे यांनी याची चौकशी केली असता प्रकरण संशयास्पद वाटले. बंडूच्या घरच्यांनी त्याने विषारी द्रव्य प्राषण केल्याचे सांगितले असले तरी शवविच्छेदनात विषारी द्रव्याचा अंश नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तसेच मयताच्या डोक्यात मार असल्याचे व हात फ्रॅक्चर असल्याचेही यात उघड झाले. यानंतर बाळापुर पोलिसांनी चौकशीचे चक्र फिरविले असता बंडूच्या पित्याने व भावाने याप्रकरणी सत्यकथा सांगितली.

मयत बंडू हा व्यसनाधिन होता. यासोबतच तो दारू पिऊन  सर्वांना त्रास देत असे. या प्रकाराला कंटाळून आम्ही त्यास विष पाजण्याचा प्रयत्न केला. यानंतर त्याच्या डोक्यात व हातावर लाकडाने मारहाण करून त्यास जिवे मारले. तो मृत झाल्याचे कळताच आम्ही त्याने विष पिऊन आत्महत्या केल्याचे सर्वाना सांगीतले. या माहितीवरून बाळापुर पोलिसांनी जमादार तुळशीराम गुहाडे यांच्या फिर्यादीवरून आरोपी पिता नारायण ग्यानबा डाढाळे (वय-५५) व भाऊ गोविंद नारायण डाढाळे (वय-२७) दोघेही रा.पार्डी खु.ता.वसमत यांच्याविरूध्द भादंविच्या कलम ३०२,२०१,३४ अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास ठाणेदार व्यंकट केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार सदानंद मेंडके करीत आहेत.