शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

आचारसंहितेमुळे ‘त्या’ निधीवर सभा नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2018 00:37 IST

जिल्हा परिषदेच्या हक्कावर वारंवार गंडांतर येत असल्याने हैराण झालेल्या जि.प. सदस्यांनी आता ५0५४ च्या निधीसाठी सभा घेण्याचे नियोजन केले होते. मात्र मध्येच आचारसंहिता लागल्याने ही सभा आता त्यानंतरच होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्हा परिषदेच्या हक्कावर वारंवार गंडांतर येत असल्याने हैराण झालेल्या जि.प. सदस्यांनी आता ५0५४ च्या निधीसाठी सभा घेण्याचे नियोजन केले होते. मात्र मध्येच आचारसंहिता लागल्याने ही सभा आता त्यानंतरच होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.हिंगोली जिल्हा परिषदेला जिल्हा नियोजन समितीकडून ५0५४ हे लेखाशीर्ष वर्ग करताना त्यासोबतच कामांची शिफारस केली होती. ही कामे आमदार, खासदार, पालकमंत्री आदींनी शिफारस केल्याचे सांगितले जात होते. मात्र याला अनेक जि.प.सदस्यांचा उजर होता. परंतु यावर तडजोड करण्याचे प्रयत्न केले जात होते. त्यामुळे सदस्यांनी सभा घेण्यासाठी स्वाक्षरी मोहीम तर राबविली. मात्र हे पत्र पुढे रेटले नाही. दरम्यान आचारसंहिता लागू झाली आणि सर्वच मुसळ केरात गेले. त्याचा परिणाम म्हणून आता अनेकांना ही कामे जिल्हा प्रशासनाने केलेल्या शिफारसींप्रमाणे होणार असल्याचे वाटत आहे. मात्र जि.प.त आलेल्या निधीचे नियोजन जि.प.नेच करायचे, अससल्याचा शासन आदेश दाखवून काहींनी ही कामे रद्द करून नवीन कामे घेण्यात यावीत, अशी भूमिका घेतली आहे. तर परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातील विधान परिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर सभा घेवूनच त्याचे नियोजन केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे तोपर्यंत कुणालाच काही करता येणार नसल्याने हा १.९८ कोटींचा निधी कात्रीत सापडला आहे. तर दोन वेगवेगळ्या सभागृहाच्या लोकप्रतिनिधींत अधिकारावरुन संघर्ष उभा राहिला आहे.दलित वस्ती सुधार योजनेत यापुढे आमदार, खासदार यांनी शिफारसी केलेली कामेच होणार आहेत. नवा आदेश राज्य शासनाने काढला असून या आदेशानुसारच पुढील कामे करण्यास सांगितले आहे. लोकप्रतिनिधींनी कामे सुचवावीत, असे आदेशात नमूद करून लोकप्रतिनिधी म्हणजे आमदार, खासदार, पालकमंत्री हेच राहणार आहेत. त्यामुळे या प्रकरणातूनही राज्यभर संघर्ष उभा राहण्याची चिन्हे असून न्यायालयात जाण्याची तयारी आहे. यापुढे या संघर्षाला आणखी धार येऊ शकते. मात्र पंचायत राज मोडीत काढण्याचा डाव सुरू असल्याचे दिसत आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीHingoli z pहिंगोली जिल्हा परिषद