शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोली जिल्ह्यात ३३ बेरोजगारांनाच बँकेचे कर्ज मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 19:31 IST

जिल्ह्यातील ४३६ पैकी केवळ ३३ बेरोजगारांनाच बँकेने कर्ज मंजूर केले आहे. 

ठळक मुद्दे जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजनेंतर्गत ६३ प्रस्तावांचे भौतिक तर १.१२ कोटींचे आर्थिक उद्दिष्ट होते. जवळपास ४५५ प्रस्ताव कार्यालयात प्राप्त झाले होते. त्यापैकी ४३६ प्रस्ताव विविध बँनांना पाठविले त्यापैकी केवळ ३६ प्रस्तावांनाच मंजुरी मिळाली आहे,तर २५३ प्रस्ताव बाद ठरविण्यात आले आहेत.

हिंगोली : जिल्ह्यात नवउद्योजकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. परंतु बँकांच प्रतिसाद देत नसल्याने अनेक जण प्रस्ताव दाखल करण्याकडे पाठ फिरवितात. याचा खराखुरा अनुभव यंदा जिल्हा उद्योग केंद्राकडून प्रस्ताव दाखल केलेल्यांना आला आहे. जिल्ह्यातील ४३६ पैकी केवळ ३३ बेरोजगारांनाच बँकेने कर्ज मंजूर केले आहे. 

हिंगोली जिल्ह्याची ओळखच मुळात ना उद्योग जिल्हा म्हणून अजूनही कायम आहे. जिल्ह्यामध्ये अनेकांना उद्योग उभारण्याची मनोमन इच्छा असतानाही पैशाअभावी अनेकांच्या स्वप्नावर पाणी फिरल्यागत होत आहे. त्यातच बँका तर जवळही फिरकू देत नसल्याने अनेकांनी बँकेचा उंबराच चढणे सोडून दिले. तरीही काहींनी प्रयत्न करायला काय हरकत आहे असे म्हणत जिल्हा उद्योग केंद्राकडे प्रस्ताव दाखल केले. येथे जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजनेंतर्गत ६३ प्रस्तावांचे भौतिक तर १.१२ कोटींचे आर्थिक उद्दिष्ट होते. जवळपास ४५५ प्रस्ताव कार्यालयात प्राप्त झाले होते. त्यापैकी ४३६ प्रस्ताव विविध बँनांना पाठविले असता त्यापैकी केवळ ३६ प्रस्तावांनाच मंजुरी मिळाली आहे. तर २५३ प्रस्ताव बाद ठरविण्यात आले आहेत. तर १८३ प्रस्ताव बँक स्तरावर प्रलंबित असल्याची आकडेवारी जिल्हा उद्योग केंद्राकडून मिळाली आहे. प्राप्त प्रस्तावांच्या तुलनेत मंजूर प्रस्तावांची संख्या नगण्य असल्यामुळे अनेक नवउद्योजकांचा हिरमोड झाला आहे. अनेकजण अजूनही बँकांचे उंबरवटे झिजवण्यातच हैराण असून प्रशासनही हतबल दिसत आहे. दाद मागावी तरी कोणाकडे ? असा प्रश्न तरुणांना पडला आहे. 

अनेकांच्या स्वप्नावर फिरले पाणी मागील अनेक वर्षांपासून कर्ज देण्यासाठी बँकाच उदासीन असल्याने अनेक नवउद्योकांना व्यवसाय उभारणीपासून दूर राहण्याची वेळ येत आहे. वास्तविक पाहता जिल्हाधिकार्‍यांनी बैठका घेऊन - घेऊन बँक अधिकार्‍यांना प्रस्ताव मंजूर करण्याचे सुचविले होेते. मात्र त्याचा मोजक्याच बँक अधिकार्‍यावर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. अनेक बँकेत तर ० च्यापुढे आकडाच अजूनपर्यंत गेलेला नाही हे विशेष! त्यामुळे अनेक नवउद्योजकांचा हिरमोड होत असून, याकडे पुन्हा एकदा वरिष्ठांनी लक्ष देणे गरजेचे आहे. 

सूचनेकडे दुर्लक्षजिल्हा उद्योग केंद्राकडे प्रस्ताव दाखल झाल्यानंतर घेतलेल्या बैठकीत जिल्हाधिकार्‍यांनी सर्वच बँकेला उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दिलेल्या सूचनेकडे साफ दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.