शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

सेनगावात शासन निर्णयाविरोधात व्यापाऱ्यांचा बंद; दोन दिवसांपासून व्यवहार ठप्प 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 17:51 IST

शेतकऱ्यांचा शेतमाल हमीभावा पेक्षा कमी दराने खरेदी केल्यास गुन्हे दाखल करण्याचा निर्णयाच्या निषेधार्थ सेनगाव येथील व्यापाऱ्यांनी बेमुदत खरेदी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

सेनगाव (हिंगोली ) : शेतकऱ्यांचा शेतमाल हमीभावा पेक्षा कमी दराने खरेदी केल्यास गुन्हे दाखल करण्याचा निर्णयाच्या निषेधार्थ सेनगाव येथील व्यापाऱ्यांनी बेमुदत खरेदी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मागील दोन दिवसापासून सेनगाव येथील दोन्ही कृषी उत्पन्न बाजार समिती मधील खरेदी- विक्री व्यवहार ठप्प आहेत.

शासनाने नवीन शासन निर्णय काढून भुसार माल किमान आधार भूत किमतीपेक्षा कमी दराने खरेदी केल्यास व्यापारी वर्गावर गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेतला असल्याने या विरोधात  भुसार व्यापारी आक्रमक झाले आहे.या विरोधात भुसार असोशिएशनने बुधवारपासून शेतमालाची खरेदी बेमुदत बंद केली आहे. सदर शासन निर्णय मागे घेत नाही तो पर्यंत खरेदी बंद ठेवण्याचा निर्णय तालुका भुसार असोशिएशनने घेतला आहे. त्या मुळे शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती व एका खाजगी बाजार समिती मधील शेतमाल खरेदी व्यवहार दोन दिवसापासून पूर्णतः  बंद आहेत.

बेमुदत बंद असल्याने शेतमाल विक्री साठी आणणाऱ्या शेतकऱ्यांची गैरसोय होत असून शेतमाल वापस न्यावा लागत आहे. जो पर्यंत शासन निर्णय मागे घेत नाही तो पर्यंत शेतमाल खरेदी बंदच राहणार अशी माहिती  भुसार संघटनेचे तालुका अध्यक्ष बालमुंकद जेथलिया यांनी दिली. शासनाने व्यापाऱ्यांना वेठीस धरणारा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष केदारमल सारडा यांनी केली.  दोन्ही बाजार समित्या बंद असल्याने शेतकऱ्यांची मोठी गैरसोय झाली आहे.शासनाने या संबंधी तातडीने तोडगा काढण्याची गरज आहे.

टॅग्स :State Governmentराज्य सरकारGovernmentसरकारMarketबाजारHingoliहिंगोली