शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणासाठी केले मुंडण आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 23:45 IST

मागील पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटला आहे. याचाच भाग म्हणून येथील महात्मा गांधी चौकात ३० जुलैपासून सकल मराठा समाजाच्या वतीने ठिय्या आंदोलन सुरू आज सरकारच्या निषेधार्थ ११ जणांनी मुंडण करून तीव्र शब्दात निषेध नोंदविला. तर मुख्यमंत्र्यांचा फोटो मांडून श्राध्दही घातले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : मागील पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटला आहे. याचाच भाग म्हणून येथील महात्मा गांधी चौकात ३० जुलैपासून सकल मराठा समाजाच्या वतीने ठिय्या आंदोलन सुरू आज सरकारच्या निषेधार्थ ११ जणांनी मुंडण करून तीव्र शब्दात निषेध नोंदविला. तर मुख्यमंत्र्यांचा फोटो मांडून श्राध्दही घातले.दरदिवशी नाविन्यपूर्णरीत्या हे आंदोलन पुढे रेटण्यात येत आहे. गुरूवारी गोंधळ आंदोलनानंतर शुक्रवारी मुंडण आंदोलन केले. यामध्ये ११ समाज बांधवांनी मुंडण करत सरकारचा निषेध केला. यावेळी आंदोलकांसमोर मडकं ठेवून गवऱ्यांची धूनही पेटविली होती. 'राम नाम सत्य है' असे म्हणत श्राद्ध घालण्यासाठी विधीवत मंत्राची उच्चारणाही या आंदोलनात करण्यात आली.दरम्यान, आंदोलकांनी एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजीही केली. मुख्यमंत्र्यांच्या फोटोला खिचडी, भजीय व जिलेबीचा नैवद्य ठेवला होता. यानंतर मुंडण आंदोलनात सहभागी सर्वच कार्यकर्त्यांना टोप्या व रूमालाचा आहेर केला. शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. गांधी चौकात मोठा जनसमुदाय एकत्रित आला होता. रोजच नाविन्यपूर्ण आंदोलन केले जात असल्याने ठिय्या आंदोलनाची चर्चा जिल्हाभरात होत आहे.पहेणी, वैजापूरकरांचा रास्ता रोकोनर्सी नामदेव : हिंगोली जिल्हाभरात सर्वत्र मराठा आरक्षणाची मागणी जोर धरू लागली आहे. हिंगोली ते रिसोड या रस्त्यावरील गावे यात मागे नसून रस्त्यावरील प्रत्येक गावांनी सहभागी होवून या आंदोलनास पाठिंबा दिला आहे. रिसोड रस्त्यावरील राहोली, केसापूर, नर्सी, पहेणी, वैजापूर, सरकळी, पुसेगाव, खुडज, सेनगाव, कोळसा, कवठा, कन्हेरगाव यासह अनेक ग्रामस्थांनी आंदोलनाची धग कायमच ठेवली आहे. पहेणी, वैजापूर येथील सकल मराठा समाज कार्यकर्त्यांनी नर्सी जवळील पहेणी- वैजापूर या रस्त्यावर टायर पेटवून तब्बल दोन तास रास्ता रोको केला.आमदारांचा पाठिंबावसमत : येथे मराठा समाजाच्या ठिय्या आंदोलनास भेट देवून आ.जयप्रकाश मुंदडा यांनी पाठिंबा दर्शविला. यावेळी ते म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षण मागणीस पूर्ण पाठिंबा दिलेला आहे. त्यांच्या आदेशानुसारच शिवसेना मराठा आरक्षण आंदोलनाच्या बाजूने आहे. शिवसेनेचे सर्व आमदार आरक्षण मागणी व आंदोलनाच्या बाजूने असल्याचे म्हणाले. यावेळी त्यांच्यासोबत कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :HingoliहिंगोलीMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा