शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
2
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
3
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
4
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
5
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
6
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
7
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
8
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
9
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
10
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
11
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
12
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
13
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
14
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
15
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
16
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
17
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
18
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
19
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
20
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक

हस्ताक्षर सुधारण्यासाठी काम करणारा अवलिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:30 IST

सेनगाव : हजारो विद्यार्थ्यांसह अनेकांना हस्त लेखनाचे धडे देणाऱ्या तालुक्यातील गुगळपिंपरी येथील पांडुरंग प्रल्हाद चोपडे हा हस्ताक्षर ...

सेनगाव : हजारो विद्यार्थ्यांसह अनेकांना हस्त लेखनाचे धडे देणाऱ्या तालुक्यातील गुगळपिंपरी येथील पांडुरंग प्रल्हाद चोपडे हा हस्ताक्षर तज्ज्ञ मागील पंधरा वर्षापासून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी वाचन लेखन कौशल्य सक्षम करण्यासाठी झटत आहे.

दरवर्षी २३ जानेवारी हस्ताक्षर दिन म्हणून साजरा केला जातो. अडगळीत पडलेल्या या विषयावर तालुक्यातील गुगळपिंपरी येथील पांडुरंग चोपडे हा सुशिक्षित बेरोजगार तरुण मात्र सततपणे या विषयावर काम करीत असून अनेकांना अक्षर सुधारण्यासाठी धडे देत आहेत. सुंदर हस्ताक्षर कार्यशाळा या शैक्षणिक उपक्रम राबवित आहे. कारण हस्ताक्षराचा संबंध माणसाच्या मेंदूशी असतो म्हणूनच आजपर्यंत महाराष्ट्रामधील जिल्हे तसेच तालुके व ग्रामीण भागातसुद्धा हा उपक्रम राबवत आहे. त्यामध्ये आतापर्यंत ६ लाख विद्यार्थ्यांचे लेखन कौशल्य विकसित करून विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीमध्ये झाली. तसेच २०१७-२०१८ या वर्षांमध्ये जिल्हा परिषद शिक्षण विभाग अंतर्गत सुंदर अक्षर कार्यशाळा घेण्यात आली. त्यामध्ये वर्ग पाचवी ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना सुंदर हस्ताक्षर प्रशिक्षण देण्यात आले. त्यामध्ये एकूण तीन हजार विद्यार्थी होते. जिल्ह्यातील २२ शाळेतील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. विद्यार्थ्यांनी इंग्रजी मराठी दोन्ही हस्ताक्षरातमध्ये अमुलाग्र बदल घडून आणला. तसेच सन २०२८-२०१९ या वर्षामध्ये जिल्हा परिषदेतील १५ शाळांमध्ये १६०० विद्यार्थ्यांना सुंदर हस्ताक्षराचे प्रशिक्षण देऊन विद्यार्थ्यांचे सुंदर हस्ताक्षर सुधारण्याचे काम केले आहे.

विद्यार्थ्यांच्या हस्ताक्षरामध्ये सुधारणा झाल्याचे पाहून जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एच.पी.तुम्मोड यांनी कौतुक केले. विद्यार्थ्यांचे सुंदर अक्षर सुधारण्यासाठी सुरुवातीस दहा दिवसीय कार्यशाळा घेण्यास सुरुवात केली. दहा दिवस दररोज एक तास याप्रमाणे वर्ग घेण्याचे सुरू केले. महात्मा गांधीजी म्हणायचे सुंदर अक्षर चांगल्या व्यक्तिमत्वाचा दागिना आहे. म्हणूनच त्यांची प्रेरणा घेऊन मी कार्यशाळेला सुरुवात केली. शहरी भागात विद्यार्थ्यांना कोणतेही मार्गदर्शन उपलब्ध होते पण ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना ही संधी मिळत नाही. म्हणूनच मी ग्रामीण भागातील शाळांना भेटी दिल्या हिंगोली जिल्ह्यापासून राज्यातील सर्व जिल्ह्यात अशा प्रकारच्या सुंदर अक्षर कार्यशाळा घेतल्या.

जि.प. च्या मदतीने केले कार्य

जिल्हा परिषदेच्या शाळेच्या शिक्षकांच्या मदतीने हे कार्य केले. कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करता आजही मी असलेला हा सुंदर हस्ताक्षर यांचा वारसा विद्यार्थ्यांना अव्यवहारपणे वाटप करीत आहे. सर्व सुंदर अक्षर कार्यशाळा तीन टप्प्यांमध्ये विद्यार्थ्यांना शिकवले जाते. पहिल्या टप्प्यामध्ये अक्षर सुधारणा शिकवली जाते. इंग्रजी मधील काही अक्षरे रेषेच्यावर असतात तर काही अक्षरे ५० टक्के उंचीवर घ्यावे लागतात. त्यासोबतच रेषेखालील असलेले अंतर समजून घ्यावे लागते. मराठीमधील पहिला टप्पा रेषेच्या खाली असणारी अक्षरे दुसरा टप्पा रेषेला चिपकणारी अक्षरे यातील प्रमाणबद्धता सांगावी लागते. तिसऱ्या टप्प्यात वाक्य कौशल्य शिकवले जाते त्यामधील प्रत्येक वाक्यातील शब्दातील अंतर मांडणे व शब्द भरून डोक्यावर रेषा माराव्या लागतात.

खराब हस्ताक्षर अर्धवट शिक्षणाचे लक्षण होय म्हणूनच ‘अक्षर सुधार-जीवन सुधार’ हा उपक्रम मी राबवत असल्याचे चोपडे यांनी सांगितले.

फोटो