शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

औंढा पं.स.ची सभा ठरली वादळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 23:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क औंढा नागनाथ : येथील पंचायत समितीची सभा वादळी ठरली. शिक्षण विभागाच्या कारभारावर पंचायत समितीच्या सदस्यांनी आसूड ...

ठळक मुद्देशिक्षण गाजले : अधिकारी झाले निरुत्तर

लोकमत न्यूज नेटवर्कऔंढा नागनाथ : येथील पंचायत समितीची सभा वादळी ठरली. शिक्षण विभागाच्या कारभारावर पंचायत समितीच्या सदस्यांनी आसूड ओढत प्रौढ वर्गांचा मुद्दा चांगलाच उचलून धरला होता. यात चौकशीची मागणी करण्यात आली.सभापती भीमराव भगत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या आढावा बैठकीस उपसभापती रामप्रसाद कदम, गटविकास अधिकारी सुधीर ढेंबरे, सहायक गटविकास अधिकारी जगदीश साहू, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अविनाश गायकवाड, अभियंता गोविंद चव्हाण, आदींची उपस्थिती होती.यावेळी पं.स.सदस्य शरद पोले यांनी साक्षर भारत अभियानांतर्गत कुठेच प्रौढ शिक्षणाचे वर्ग चालू नसून तरीही प्रेरकांना दरमहा दोन हजार रुपयांचे मानधन दिले जात असल्याचा आरोप केला आहे. यावेळी गटशिक्षणाधिकारी बगाटे यांनी मात्र मुख्याध्यापकांनी दिलेल्या अहवालानुसारच बिले काढल्याचे सांगितले. रात्रीचे वर्ग चालू आहेत की नाही, याची तपासणी तुम्ही केली का, या प्रश्नावर मात्र ते निरुत्तर झाले होते. त्यानंतर त्यांनी चौकशी करतो, असे सांगून वेळ मारून नेली. त्यानंतर पाणीटंचाईवरही सदस्यांनी आक्रमकपणे बाजू मांडली. हातपंप दुरुस्तीचे वाहन व पथक सज्ज ठेवण्यास सांगण्यात आले. मग्रारोहयोची प्रकरणे ज्येष्ठतेनुसार निकाली काढण्याची सूचनाही यावेळी करण्यात आली.यावेळी पं.स.सदस्य भीमराव कºहाळे, शरद पोले, ज्ञानोबा गारोळे, नीता गिºहे, निर्मला दळवे, शोभा कºहाळे, सुभद्रा ठोंबरे, संगीता ढेकळे, संजय नागरे, सुधा आकमार, भगवान कदम, सुरेश फुडकर आदी हजर होते.वगरवाडीवर चर्चा : विद्युतीकरणावर बोटवगरवाडी येथील डेेंग्यूच्या साथीमुळे तिघांचा मृत्यू झाल्याच्या प्रकाराबाबतही या बैठकीत चर्चा झाली. तर प्राथमिक आरोग्य केंद्रात नियमित अधिकारी-कर्मचारी राहत नाहीत. उपकेंद्र तर अनेकदा बंदच असतात. आरोग्य सेवक व सेविकाही अशा गावांत थांबत नसल्याचे नीता गिºहे यांनी सांगितले. विद्युतीकरणासाठी प्रत्येक शाळेला साडेसात हजार रुपये शासनाकडून मिळाले आहेत. ते किती शाळांना वितरित केले व किती शाळांनी यातून कामे केली, याचे उत्तरही देता आले नाही. तर शापोआ कर्मचाºयांचे मानधन अदा करण्यासही सांगण्यात आले.