शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
2
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
3
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
4
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
5
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
6
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
7
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
8
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
9
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
10
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
11
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
12
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
13
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
14
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
15
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
16
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
17
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
18
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
19
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
20
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
Daily Top 2Weekly Top 5

गुटखा तस्करीवर प्रहार; कर्नाटकातून कंटेनरभरून आलेला ५० लाखांचा गुटखा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 16:56 IST

शहर पोलिसांनी चार दिवसापूर्वीच मोंढा भागातील एका ठोक किराणा व्यापाराच्या आड चालणारा गुटख्याचा धंदा उघड केला होता.

ठळक मुद्देचार दिवसांतील दोन मोठ्या कारवायांमुळे वसमत येथे गुटख्याचे मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे. 

वसमत ( हिंगोली ) : शहरातील मोंढा भागात चार दिवसापूर्वीच गुटख्याचा मोठा साठा जप्त केल्याची घटना ताजी असताना आज पुन्हा गुटख्याचा एक कंटेनर वसमत पोलिसांच्या तावडीत सापडला आहे. कंटेनरमधून ५० लाखांचा गुटखा पोलिसांनी जप्त केला आहे. चार दिवसांतील दोन मोठ्या कारवायांमुळे वसमत येथे गुटख्याचे मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे. 

वसमत शहर गुटक्याचे माहेरघर झाले आहे. शहर पोलिसांनी चार दिवसापूर्वीच मोंढा भागातील एका ठोक किराणा व्यापाराच्या आड चालणारा गुटख्याचा धंदा उघड केला होता. यात प्रतिष्ठित व्यापारी म्हणून वावरणाराच आरोपी निघाला. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच आज गुटख्याने भरलेला कंटेनर वसमतमध्ये दाखल झाल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली. 

हेही वाचा - चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक उलटला; एका मजुरासह ८० मेंढ्या दगावल्या

माहितीवरून पोलिसांनी शिराज कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर उभ्या कंटेनरची तपासणी केली. यावेळी कंटेनरमध्ये गुटख्याच्या ५० पिशव्या आढळून आल्या. चालकाची कसून चौकशी केली असता बेंगलोर येथून हा गुटखा वसमत येथे आल्याचे पुढे आले. ही कारवाई पोलीस निरीक्षक शिवाजी गुरमे, उपनिरीक्षक बी एस खारडे, पोलीस नाईक भगीरथ सवंडकर,  बालाजी जोगदंड, दिलीप पोले आदी कर्मचाऱ्याच्या पथकाने केली. 

विशेष म्हणजे, चार दिवसांपूर्वी कारवाई झालेल्या मोंढा भागापासून जवळच असलेल्या वस्तीत हा कंटेनर उभा होता. त्यामुळे पहिल्याच आरोपीचा या कंटेनरसोबतही संबंध असल्याची शक्यता आहे. यावरून शहरातील गुटखा रॅकेट किती मुजोर झाले आहे याचा प्रत्यय येत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोली