शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

घरातला वाद डोक्यात ठेवला; दिराने शेतात भावजयीवर कुऱ्हाडीने वार केला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 20:10 IST

हिंगोली जिल्ह्यात कौटुंबिक वादातून दिराने केला भावजयीचा खून

ठळक मुद्दे डोक्यात घातली कुऱ्हाडनंतर आरोपीचेही विषप्राशन

बासंबा (जि. हिंगोली) : हिंगोली तालुक्यातील जोडतळा येथे किरकोळ कौटुंबिक वादाचा राग मनात धरून दिराने डोक्यात कुऱ्हाडीने वार करीत सविता संजय जाधव (२८) या आपल्या भावजयीचा खून केली. ही घटना बुधवारी दुपारी घडली.

जोडतळा येथील सविता जाधव या गावातील एकाच्या शेतात निंदण काम करण्यासाठी गेल्या होत्या़ दुपारी महिलेसोबत शेतात जेवण करत असताना रामेश्वर जाधव (२५) हा तेथे आला. त्याने कोणाहीशीही न बोलता थेट भावजय सविता यांच्या डोक्यात कुऱ्हाडीचे तीन ते चार प्रहार केले़ यादरम्यान बाजूला असलेल्या महिलांनी त्याला थांबविण्याचा प्रयत्न करीत आरडाओरडा केला़ मात्र, रामेश्वर सोडविणाऱ्यांच्या अंगावरही कुºहाड घेऊन धावत होता. सविता निपचित पडल्यानंतर घटनास्थळावरून तो पसार झाला़ 

या घटनेची माहिती मिळताच पोलीस दाखल झाले. या घटनेमागे घरगुती वादाचे कारण असल्याचे समोर येत आहे. सकाळी झालेला वाद डोक्यात ठेवून रामेश्वरने हे कृत्य केले. पैशावरुन हा वाद झाला असल्याचे सांगितले जाते.

मयताच्या मुलींचा हृदयद्रावक आक्रोश मयत सविता यांना चार अपत्ये आहेत. यात तीन मुली व एक मुलगा आहे. सविता यांच्या प्रेताच्या शेजारी बसून असलेल्या त्यांच्या दोन मुली अंजली व जान्हवीचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता, तर एक वर्षाचा मुलगाही आईला उठविण्याचा प्रयत्न करीत होता. तिसरी कार्तिकी नावाचीही मुलगी आहे. बाजूलाच शिदोरी सोडलेली दिसत होती, तर झटापटीत भाजी सांडल्याचे दिसत होते.

दिराचा आत्महत्येचा प्रयत्न या घटनेनंतर रामेश्वर जाधव याने विषारी द्रव प्राशन केले़ यानंतर त्याच्या सासऱ्याने त्याला सिरसम येथील आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले होते. मात्र तो तेथूनही पसार झाला आहे. रामेश्वरला मिरगीचा आजार असल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले. 

टॅग्स :MurderखूनHingoliहिंगोली