शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील अतिक्रमणे ेहटविणार-पालकमंत्री

By admin | Updated: January 28, 2015 14:11 IST

मुख्य रस्त्यावर असलेली अतिक्रमणे हटविण्याची कार्यवाही लवकरच सुरू केली जाईल. तसे आदेशही जिल्हाधिकार्‍यांना दिल्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

हिंगोली : /शहरात /मुख्य रस्त्यावर असलेली अतिक्रमणे हटविण्याची कार्यवाही लवकरच सुरू केली जाईल. तसे आदेशही जिल्हाधिकार्‍यांना दिल्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.यावेळी आ.तानाजी मुटकुळे, जिल्हाधिकारी तुकाराम कासार, मुख्य कार्यकारी अधिकारी पी. व्ही. बनसोडे भाजपा जिल्हाध्यक्ष बाबाराव बांगर, बी. डी. बांगर आदी उपस्थित होते. पालकमंत्र्यांनी सांगितले, येथे विकासासाठी मोठा वाव आहे. सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची ग्वाही दिली. त्यामुळे आगामी काळात विकासकामे गतीने कशी करता येतील, यावर कटाक्ष राहील. मागील दोन दिवसांत पोलिस वसाहत, पोलिस अधीक्षक कार्यालय, जलेश्‍वर तलाव, चिरागशहा तलाव आदीची पाहणी केली. त्यात या तलावांची खोली वाढविणे व सुशोभिकरण केल्यास सिंचन व पिण्याच्या पाण्याची सोय होणार आहे. पर्यटनाच्या दृष्टीनेही ही स्थळे विकसित करता येतील. औंढा व नर्सी नामदेवचाही याच पद्धतीने विकास करण्यासाठी प्रयत्न आहेत. पीक विमा मिळण्यात ज्या निकषांच्या अडचणी आहेत, त्या प्रत्यक्ष शेतकर्‍यांच्या भेटी घेवून सोडवण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. शहरातील अतिक्रमणांचा मुद्दाही लवकरच निकाली काढण्यात येईल, असे ते म्हणाले. डीपीसीत अनेक विभागांना दिलेला निधी अपुरा असतो त्यामुळे तो ते परत करतात, त्याचे पुनर्विनियोजन करावे लागते. मात्र ज्या योजनांना निधीची गरज आहे, त्यांना अपुरा निधी दिला जातो, याबाबत विचारले असता त्याबाबत आगामी काळात लक्ष दिले जाईल, असे त्यांनी सांगितले. शहरात ठिकठिकाणी मांसविक्रीचे दुकाने असल्याने त्यांना नेमून दिलेल्या जागीच व्यवसाय करण्यास भागा पाडा, असे सांगितले.

 ■ या भागाचा सिंचनाचा मोठा प्रश्न आहे. मोठय़ा धरणांतून जिल्ह्याचे हक्काचे पाणी मिळावे, अशी भूमिका आहे. ती पूर्ण करण्यासाठी लवकरच जलसंपदामंत्र्यांना हिंगोलीच्या दौर्‍यावर आणून परिस्थिती अवगत करून दिली जाईल, अे पालकमंत्री म्हणाले. ४/शासकीय अधिकार्‍यांची रिक्त पदे भरण्यासाठीही प्रयत्न केले जातील. जे डॉक्टर खाजगी व्यवसायाकडेच अधिक लक्ष देतात, त्यांना शासकीय सेवेतून मुक्त करून नव्याने पदे भरण्याची कारवाई करण्याचा इशाराही दिला.