शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

अन् राजकीय शांतता पसरली...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 00:28 IST

जिल्ह्यात मागील काही दिवसांत विविध राजकीय घडामोडींनी वातावरण रंगले होते. त्यातच पाच राज्यांतील निवडणुकीचे निकाल लागले अन् आता एकदम चिडीचूप परिस्थिती निर्माण झाली आहे. अचानक झालेल्या या बदलाने सामान्यांना मात्र हायसे वाटत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात मागील काही दिवसांत विविध राजकीय घडामोडींनी वातावरण रंगले होते. त्यातच पाच राज्यांतील निवडणुकीचे निकाल लागले अन् आता एकदम चिडीचूप परिस्थिती निर्माण झाली आहे. अचानक झालेल्या या बदलाने सामान्यांना मात्र हायसे वाटत आहे.लोकसभा निवडणुकीला सहा महिने राहिले. ही निवडणूक लढणाऱ्यांनी मैदानात उतरणे साहजिक आहे. मात्र विधानस इच्छुकांनीच त्या आधी गुडघ्याला बाशिंग बांधल्याने मोठी गोची निर्माण झाली होती. लोकसभेचे घोडे बाजूलाच अन् ही मंडळीच उतावीळपणा करून चर्चेत येत होती. त्यात आताच निवडणुका नसल्याने धसमुसळेपणा वाढीस गेल्याने वातावरणही तंगले होते. एक-दोन मतदारसंघातील ठरावीक मंडळीच या रणांगणात आधीच उतरल्याचे दिसत होते. मात्र आता लोकसभा असो वा विधानसभा. कोणत्याही निवडणुकीसाठीचा पुढारी घराबाहेरही पडत नसल्याचे दिसत आहे. पाच राज्यांतील निवडणुकांमुळे काँग्रेसमध्ये चैतन्य आले असले तरीही या पक्षाने पाहिजे तेवढ्या प्रमाणात मरगळ झटकली नाही. खा.राजीव सातव आले की, अ‍ॅक्टिव्ह होणारा हा पक्ष त्यांच्या दिल्ली दौºयात निपचित पडून राहतो. या पक्षात अनेकांना विधानसभेचे वेध लागल्याने ही मंडळी तेवढी चर्चेत येण्याचा प्रयत्न करू लागली. मात्र जनमाणसात जावून कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न स्पर्धेपुरताच उरल्याचे दिसत आहे. भाजप तर सत्ताधारी असल्याने त्यांनी नेतेमंडळी जमा करून ठेवली. मध्यंतरी सीएम चषकाच्या निमित्ताने या मंडळींनी लोकांमध्ये मिसळण्याचा प्रयत्न केला. त्यातही काही जणांचाच पुढाकार होता. जिल्हाध्यक्ष तथा आ.तान्हाजी मुटकुळे यांची भ्रमंती तेवढाच पक्षाचा कार्यक्रम असतो. राष्ट्रवादीची वरिष्ठ नेतेमंडळी कमालीची कामाला लागल्याचा साक्षात्कार हिंगोली जिल्ह्यालाही होत आहे. दर आठ दिवसाला कुणीतरी वरिष्ठ नेता येतो. स्थानिकांना कामाला लावतो. शिवसेनेत तर लोकसभा उमेदवाराचा शोधच संपणार नसल्याचे दिसत असून त्यांना ही जागा लढायची की नाही? असा संभ्रम निर्माण होण्याइतपत परिस्थिती गंभीर आहे.मध्यंतरी कळमनुरीचे काँग्रेस आ.संतोष टारफे व सेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांच्यात रंगलेल्या कलगीतुºयामुळे चर्चेत असलेली सेना आता पुन्हा थंड पडल्यात जमा आहे. एकंदर जिल्ह्यातील प्रमुख पक्षांसारखीच इतरांचीही स्थिती आहे. इतरही कोणी मैदानात उतरणार असल्याचे संकेत देत नसल्याचे चित्र आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीPoliticsराजकारण