शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

...तर अधिकारी-कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 00:10 IST

जे शासकीय अधिकारी-कर्मचारी दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर करणार नाहीत, त्यांच्यावर मोटार वाहन कायद्यांतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. दुचाकी चालकांचे होणारे अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जे शासकीय अधिकारी-कर्मचारी दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर करणार नाहीत, त्यांच्यावर मोटार वाहन कायद्यांतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. दुचाकी चालकांचे होणारे अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.रस्त्यावरील अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. विशेष करून दुचाकी चालकांचे होणारे अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. अपघाताचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचा वेळोवेळी आढावा घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार देश पातळीवर रस्ता सुरक्षा समिती, राज्य पातळीवर राज्य सुरक्षा समिती व जिल्हास्तरावर जिल्हा सुरक्षा समितीची स्थापना करण्यात आलेली आहे.हिंगोली जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीमध्ये आपघातांचा आढावा घेतला असता दुचाकी वाहनाचे अपघाताचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून येते. त्यावरुन रस्त्यावरील अपघात कमी करण्याच्या दृष्टिकोनातून दुचाकी चालवताना हेल्मेटचा वापर करणे गरजेच आहे. दुचाकीच्या अपघातांमध्ये डोक्यावर पडून होणाºया मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी हेल्मेट वापरणे बंधनकारक आहे. असे असतानाही हेल्मेटचा वापर होत नसल्याचे जिल्ह्यात चित्र दिसून येत आहे. सर्वसामान्य वाहनचालकांसाठी हेल्मेटची सक्ती करण्या अगोदर मोटार वाहन कायदा १९८८ च्या कलम १२९ व महाराष्ट्र मोटार वाहन नियम १९८९ नियम २५० च्या तरतुदीनुसार शासकीय, निमशासकीय कार्यालयातील जे अधिकारी व कर्मचारी दुचाकीचा वापर करतात त्यांना १५ जानेवारी २०१९ पासून हेल्मेट वापरणे बंधनकारक असल्यसाचे समितीमध्ये ठरविण्यात आले आहे. त्या अनुषंगाने हिंगोली जिल्ह्यात मोहीम हाती घेण्यात आली असून कारवाई केली जाणार आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय निमशासकीय कार्यालय प्रमुखांनी त्यांच्या अधिपत्याखाली असलेल्या सर्व अधिकारी व कर्मचाºयांना हेल्मेट वापराबाबत सूचना द्याव्यात. व हेल्मेट न वापरणाºयाविरूद्ध कडक कारवाई केली जाईल अशी माहिती जिल्हा सुरक्षा समितीने सांगितले.हेल्मेटचा वापर न करता दुचाकी चालविणे धोकादायक आहे. दुचाकी चालविताना सर्वांनीच हेल्मेट वापरणे गरजेचे आहे. हेल्मेट न वापरता दुचाकी चालविताना आढळून आल्यास त्यांच्याविरूद्ध थेट कारवाई केली जाणार आहे. विशेष म्हणजे शासकीय किंवा निमशासकीय विभागातील अधिकारी व कर्मचारी दररोज दुचाकीवरून ये-जा करतात. त्यांनीही हेल्मेटचा वापर करणे आवश्यक आहे. हेल्मेट न वापरता दुचाकीस्वार आढळून आल्यास त्याच्याविरूद्ध कारवाई केली जाईल - अशोक पवार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीroad safetyरस्ते सुरक्षा