कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यानजीक तसेच डॉ. आंबेडकर स्मारक समिती सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला. इतरत्र मात्र नागरिकांनी घरोघर कुटुंबीयांसमवेत जयंती साजरी करून प्रशासनाच्या सूचनांचे पालन केले. डॉ बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी आ. तान्हाजी मुटकुळे, आ. संतोष बांगर, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती समितीचे अध्यक्ष मधुकर मांजरमकर , कोषाध्यक्ष जगजीत खुराणा, पोलीस निरीक्षक पंडित कच्छवे, जिल्हाध्यक्ष चंद्रमूर्ती मांजरमकर, शहराध्यक्ष प्रकाश कांबळे आदींची उपस्थिती होती.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती सभागृहात तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण आ. तान्हाजीराव मुटकुळे यांच्या हस्ते केले. यावेळी उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, जगजीत खुराणा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष दिवाकर माने, पोलीस उपनिरीक्षक केणेकर, खलील बेलदार, हमीद प्यारेवाले, सदाशिव सूर्यतळ यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी पंचशील त्रिसरण सामूहिक ग्रहण करण्यात आले, या कार्यक्रमास मिलिंद कवाणे, सुरेश वाढे, सुनील इंगोले, रमेश इंगोले, सुभाष ठोके, प्रकाश वाढे, राजकुमार भुक्तर, सुरेश वाठोरे, मिलिंद कांबळे, कपिल इंगोले, प्रकाश कांबळे, प्रकाश कुर्हे आदी हजर होते.