शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

कृषी प्रदर्शनीतून मिळतेय रोज शेतीविषयक माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 00:11 IST

महाराष्टÑ शासनाच्या कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने घेतलेल्या जिल्हा कृषी महोत्सव व कयाधू बचत गटांचे प्रदर्शन व विक्री सेंद्रिय शेतीमाल व खरेदीदार विक्रेता संमेलनात शेतीपासून ते घरातील साहित्य आणि खाद्य पदार्थाचे स्टॉल प्रदर्शनीत थाटल्याने येथे येणाºयांना रोजच नव- नविन माहिती मिळण्यास मदत होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : महाराष्टÑ शासनाच्या कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने घेतलेल्या जिल्हा कृषी महोत्सव व कयाधू बचत गटांचे प्रदर्शन व विक्री सेंद्रिय शेतीमाल व खरेदीदार विक्रेता संमेलनात शेतीपासून ते घरातील साहित्य आणि खाद्य पदार्थाचे स्टॉल प्रदर्शनीत थाटल्याने येथे येणाºयांना रोजच नव- नविन माहिती मिळण्यास मदत होत आहे.प्रदर्शनीमध्ये एकूण २१० स्टॉल उभारण्यात आले आहेत. प्रत्येक स्टॉलवर विविध प्रकारची माहिती व साहित्य विक्रीस ठेवण्यात आल्यामुळे खरोखरच शेती अगदी सोप्या पद्धतीने कशी करता येईल? याची सखोल माहिती मिळत आहे. एवढेच नव्हे तर विविध प्रकारचे बी- बियाण्यासह आधुनिक पद्धतीने करावयाच्या शेतीसाठी लागणारे तंत्रही शेतकºयांचे आकर्षण ठरत आहेत. तसेच डीआरडीचे एकूण ४० बचत गटाचे स्टॉल असून त्यावर विविध खाद्य पदार्थ, डाळ, कपडे, शिवनकाम आदी प्रकारचे साहित्य विक्रीस ठेवले आहे. त्याच्या खरेदीला ग्राहक पंसती देत आहेत. तर बचत गटाच्या महिलांनी सुरु केलेल्या झुणका भाकरीचा अस्वाद घेण्यासाठीही शेतकºयांसह नागरिकांची एकच गर्दी होत आहे. तर विविध प्रकारचे कपडे, घरात वापरण्यासाठी इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू, विविध युग पुरुषांच्या मूर्ती आदी साहित्य ग्राहकांचे आकर्षण ठरत आहे. तर डॉ. नितीन मार्कंडे यांनी पशुधन व्यवस्थापन शाश्वत शेतीची गुरुकिल्ली यावर मार्गदर्शन केले.ज्योतीषाची भुरळ४प्रदर्शनीत तांत्रीक पद्धतीने शेती करण्यासाठी विविध यंत्रसामृगी ठेवलेली असली तरीही येथेही अंधश्रद्धा दिसून आलीच. चक्क येथे जोतीषाने स्टॉल उभारुन आपल्या बोलीभाषेने शेतकºयावर भुरळ टाकल्यामुळे अंद्धश्रद्धेची चर्चा रंगत होती.