शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ अहवालांचे एकत्रीकरण सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 00:39 IST

दलित-वस्ती सुधार योजनेचा तिढा सोडविण्यासाठी जिल्हा परिषदेत आता लगबग सुरू असल्याचे चित्र आहे. थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच आदेशाने ही कामे थांबल्याने सरपंच मंडळीचा पदाधिकाऱ्यांकडे रेटा लागला. आता सर्व पंचायत समित्यांकडून चौकशी अहवाल आल्याने एकत्रिकरणाची लगबग सुरू असल्याचे दिसत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : दलित-वस्ती सुधार योजनेचा तिढा सोडविण्यासाठी जिल्हा परिषदेत आता लगबग सुरू असल्याचे चित्र आहे. थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच आदेशाने ही कामे थांबल्याने सरपंच मंडळीचा पदाधिकाऱ्यांकडे रेटा लागला. आता सर्व पंचायत समित्यांकडून चौकशी अहवाल आल्याने एकत्रिकरणाची लगबग सुरू असल्याचे दिसत आहे.हिंगोली जिल्ह्यात गतवर्षी २६ कोटी रुपयांची कामे दलित वस्ती सुधार योजनेत मंजूर झाली होती. ही कामे मंजूर होण्यासाठीच मोठा विलंब झाला होता. त्यावेळीही जि.प.च्या नियोजनालाच खीळ घालण्याचे काहींचे मनसुबे होते. मात्र तेथे जि.प. पदाधिकाºयांनी नमते घेतले अन् काही वाटा संबंधितांच्या पदरी टाकला. त्यामुळे त्यांच्या शिफारसींना मान मिळताच जि.प.च्या समिती व सभागृहाने या कामांची यादी अंतिम करून मार्च एण्डच्या नंतर हा विषय मार्गी लावला. तो मार्गी लावल्यानंतर सर्व कामेही सुरू होत नाहीत, तोच आ.तान्हाजी मुटकुळे यांनी केलेल्या तक्रारीवरून मुख्यमंत्र्यांनी या कामांना स्थगिती दिली. नुकतीच लोकलेखा समितीसमोर आ.संतोष टारफे व आ.मुटकुळे यांच्या तक्रारीवर सुनावणीही झाल्याचे सांगितले जाते. मराठवाड्यातील जवळपास दोन हजार वस्त्यांना अद्याप लाभच मिळाला नसल्याचे त्यात समोर आले. मात्र हिंगोली जिल्ह्यात असे चित्र नसल्याचेही सूत्रांकडून कळत आहे. परंतु तरीही चौकशांचा ससेमिरा मात्र कायम असल्याने जि.प.सदस्य संताप व्यक्त करीत आहेत.जिल्हा परिषदेच्या कारभारावर अविश्वासाचे सावट निर्माण होणाºया घटना वारंवार घडत असल्याचा आरोप करून काहीजण तर याबाबत कायदेशीर बाजूने दोन हात करण्याची भाषा बोलत आहेत. मात्र पुढे कितपत शब्दावर टिकतील, हा प्रश्नच आहे.अपारंपरिक ऊर्जा निर्मितीला चालना देण्यासाठी जि.प.च्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येणारी योजना आता बंदच पडण्याच्या मार्गावर दिसत आहे. यंदा या खात्यावर टोकन रक्कम तेवढी ठेवली. मात्र पुढे काहीच हालचाली नाहीत. यापूर्वी जि.प.च्या इमारतीसह चार पं.स., काही ग्रा.पं.लासौर पॅनल बसवून विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्याचा प्रस्ताव जि.प.त मंजूर झाला होता. मात्र नंतर प्रशासनातील मतभेद त्यावर पाणी फेरून गेले. आता या योजनेला निधीच मिळत नाही. शिवाय जि.प.ने एक्सप्रेस फिडर बसवून पायावर धोंडा पाडून घेतला.जि.प.त वारंवार खंडित होणाºया वीजपुरवठ्यामुळे कामावर परिणाम होत होता. त्यामुळे येथे एक्सप्रेस फिडर घेतले आहे. त्यावर झालेला खर्च सोडा आता देयकही व्यावसायिक दराचे येत आहे. सौर उर्जा प्रकल्पामुळे त्यात बचत झाली असती.

टॅग्स :HingoliहिंगोलीHingoli z pहिंगोली जिल्हा परिषद