शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोली जिल्ह्यातील ८१८ मतदारांचे वय शंभरीपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:55 IST

हिंगोली : जिल्ह्यात नवीन मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमानंतर तीन विधानसभा मतदारसंघातील मतदारसंख्या ९.२१ लाखांवर पोहोचली आहे. नवमतदारांची संख्या ३० ...

हिंगोली : जिल्ह्यात नवीन मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमानंतर तीन विधानसभा मतदारसंघातील मतदारसंख्या ९.२१ लाखांवर पोहोचली आहे. नवमतदारांची संख्या ३० हजारांच्या आसपास पोहोचली असून १०० वर्षे वय पूर्ण केलेल्या मतदारांची संख्या अवघी ८१८ आहे.

हिंगोली जिल्ह्यात मतदार दिवसानिमित्त नवीन मतदारांची नोंदणी करण्यात आली. मतदार नोंदणीचा हा कार्यक्रम नियमितपणे सुरू असतो. त्यात ही नावे मतदार यादीत घेऊन जे मतदार स्थलांतरित झाले अथवा मयत झाले, अशांची नावे वगळण्याची मोहीम नियमितपणे राबविण्यात येते. सर्वाधिक मतदार हे २० ते २९ वर्षे वयाचे असून २.१३ लाख, ३० ते ३९ चे २.०२ लाख, ४० ते ४९ या वयाचे १.७१ लाख, ५० ते ५९ वयाचे १.२९ लाख, ६० ते ६९ वयाचे ८४ हजार, ७० ते ७९ वयाचे ४८ हजार, ८० ते ८९ वयाचे २४ हजार तर ९० ते ९९ वयाचे ६४३२ मतदार आहेत.

यामध्ये नवमतदारांची संख्या जशी वाढली तशीच तरुण मतदारांची संख्याही मोठी असल्याचे दिसून येत आहे. वृद्ध मतदारांची संख्या त्या तुलनेत अतिशय कमी आहे. शिवाय शंभरी पार केलेले तर अवघे ८१८ जण आहेत. तृतीयपंथी मतदारांची नाेंदणीही होत नसल्याचे दिसून येत आहे. एवढ्या मतदारांमध्ये अवघा एक मतदार असून तो ३० ते ३९ वयोगटातील आहे.

जिल्ह्यात ३० हजार नवमतदार

हिंगोली जिल्ह्यात ३० हजारांवर नवमतदार आहेत. या मतदारांपैकी ७ ते ८ हजार मतदारांनी मागील काही काळात नोंदणी केली आहे. प्रत्येक मतदारसंघात १८ ते १९ वर्ष वयाचा हा मतदार जवळपास १० हजारांच्या आसपास आहे. वसमत विधानसभेत पुरुष १.५१ लाख, महिला १.३९ लाख, कळमनुरीत पुरुष १.५९ लाख, महिला १.४४ लाख, हिंगोलीत पुरुष १.६२ लाख तर महिला १.४७ लाख मतदार आहेत.