शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

वगरवाडी गावात डेंग्यूने तिघांचा मृत्यू झाल्यावर प्रशासनाला जाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 00:01 IST

तालुक्यातील वगरवाडी येथे डेंग्यूच्या आजाराने थैमान घातले असून तीन महिन्यांत तिघांचा मृत्यू झाल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. आता खडबडून जागे झालेल्या आरोग्य विभागाची पथके गावात दाखल झाली आहेत.

ठळक मुद्देघाणीचा अख्ख्या गावालाच विळखा : अजूनही वगरवाडी गावात तापाची साथ सुरूच

लोकमत न्यूज नेटवर्कऔंढा नागनाथ : तालुक्यातील वगरवाडी येथे डेंग्यूच्या आजाराने थैमान घातले असून तीन महिन्यांत तिघांचा मृत्यू झाल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. आता खडबडून जागे झालेल्या आरोग्य विभागाची पथके गावात दाखल झाली आहेत.वगरवाडी हे गाव शिरडशहापूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येते. तिघांचा बळी गेल्याच्या प्रकारामुळे या गावाला प्रत्यक्ष भेट दिली. गावात प्रवेश करताच रस्त्याचे रूपांतर गटारगंगेत झाल्याचे दिसून येत होते. नाल्या तुंबल्याने डासांचा मोठा प्रादुर्भाव असून हीच बाब आजाराला निमत्रंण देत असल्याचे दिसले. कैलास नरुके यांच्या घरानजीक तर घाणीचा कहर आहे. यात त्यांचे कुटुंबच आजारी पडले आहे. राम कैलास नरूके (१४) हाही तापाने फणफणला होता. ३ नोव्हेंबर रोजी त्याचा मृत्यू झाला.त्याच्या दु:खातून कुटुंब सावरत नाही तोच स्वाती कैलास नरूके (११) ही आजारी पडली. २४ नोव्हेंबरला मृत्यू झाला. त्यांच्या घरी भेट दिली असता कुटुंबियांनी सांगितले की, आमच्या लेकराला ताप आला होता, यानंतर औंढा येथे खासगी रूग्णालयात दाखविले; परंतु ताप कमी होत नसल्याने हिंगोलीला नेले; परंतु त्यांनीही नांदेडला पाठवल्याने या पाच ते सहा दिवसात ताप जास्त होवून डेंग्यूने आमच्या लेकरांचा बळी घेतल्याचे त्यांनी सांगितले. तर शशिकला गुणाजी कच्छवे यांचाही ११ नोव्हेंबर रोजी ताप वाढल्याने म्हणजे डेंग्यूनेच झाल्याचे ग्रामस्थ सांगत होते. त्यांंच्या घरालादेखील सांडपाणी, नालीचे दूषित पाण्याने वेढा दिला आहे. मात्र आता पुन्हा गावात तापाची साथ सुरू झाली अन् तपासणीअंती आणखी तिघांना डेंग्यू झाल्याचे समोर आले. त्यामुळे ग्रामस्थांनी डेंग्यूने गावातील लोकांचा बळी जात असल्याची ओरड सुरू केली. तेव्हा आरोग्य विभाग जागा झाला.आरोग्य पथक घरोघरी भेटी देवून पाणी साठलेले रांजण, टाक्या रिकाम्या करायला लावत आहे; परंतु या पाण्यातून अळ्या निघाल्या आहेत. मागील काही दिवसांपासून तापाने फणफणत असलेले अनुष्का शिवाजी पवार, बालाजी बबन विधाटे यांच्यावर हिंगोली, परभणी येथे उपचार करून ते पूर्णपणे बरे झाले आहेत. त्यांना डेंग्यू झाल्याचे उपचारानंतर निष्पन्न झाले.आरोग्य विभागाचे कोणीच फिरकत नाही?शिरडशहापूरला प्राथमिक आरोग्य केंद्राला हे गाव जोडलेले आहे. तेथील वैद्यकीय अधिकारी हे विनोद अतुरकर असून, गावात आरोग्य सेविका पी.आर. धात्रक, ए.बी. जोगदंड आहेत; मात्र हे कर्मचारी कधीच गावात फिरुन त्यांनी जनजागृती केल्याचे पाहिले नसल्याचे ग्रामस्थ सांगत होते. त्या तिघांच्या मृत्युमुळे आरोग्य विभाग जागा झाला आहे, असे ग्रामस्थ सांगत होते.