शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

‘वैधमापन’ची कारवाई थंडावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 00:24 IST

वैधमापन शास्त्र विभागातर्फे मापात पाप करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाते. कार्यक्षेत्रात असणाºया ठिकाणी जागो-जागी कॅम्प भरवून वजने, मापे काट्यांची पडताळणी केली जाते. मात्र हिंगोलीत ही मोहीम थंडावली असून पडताळणीचा लेखा-जोखाही कार्यालयात उपलब्ध नाही. वैधमापन निरीक्षक यांच्याकडे परभणी येथील पदभार आहे. कामाचा व्याप पाहता इतर कामांचा खोळंबा होत आहे.

दयाशील इंगोले ।लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली: वैधमापन शास्त्र विभागातर्फे मापात पाप करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाते. कार्यक्षेत्रात असणा-या ठिकाणी जागो-जागी कॅम्प भरवून वजने, मापे काट्यांची पडताळणी केली जाते. मात्र हिंगोलीत ही मोहीम थंडावली असून पडताळणीचा लेखा-जोखाही कार्यालयात उपलब्ध नाही. वैधमापन निरीक्षक यांच्याकडे परभणी येथील पदभार आहे. कामाचा व्याप पाहता इतर कामांचा खोळंबा होत आहे.वैधमापन विभागातर्फे वजने, मापे व काट्यांची अचानक तपासणी केली जाते. यावेळी दोषी व्यापारी किंवा दुकानचालकाविरूद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येते. ग्राहक संरक्षणाच्या दृष्टितून हा विभाग अतिशय महत्त्वाचा आहे. परंतु मागील पाच ते सहा महिन्यांपासून कार्यालयातील कारभार ढेपाळल्याचे चित्र आहे. वैधमापन निरीक्षक यांच्याकडे हिंगोली व परभणी या दोन जिल्ह्यांचा कार्यभार आहे. परंतु विभागातील अपुरे मनुष्यबळ आणि त्यात दोन जिल्ह्यांतील कामाचा व्याप पाहाता कारवाईच्या केसेस कमी होत चालल्या आहेत. यापूर्वी हिंगोली येथील वैधमापन कार्यालयात पूर्णवेळ वैधमापन निरीक्षक कार्यरत होते. त्यामुळे कारवाईचा आकडाही मोठा होता. परंतु सध्या कार्यरत असलेल्या वैधमापन निरीक्षकाकडे दोन जिल्ह्याचा कारभार असल्यामुळे कार्यालयास आठवड्यातून एकदा त्यांची भेट असते. परिणामी कार्यालयीन कामांचाही खोळंबा होत आहे. कार्यालयात केवळ सेवकच हजर असतो. त्यामुळे वैधमापन शास्त्र विभागास पुर्णवेळ अधिकाºयाची आवश्यकता आहे. जेणेकरून ग्राहकांची होणाºया लुटीवर नियंत्रण आणण्यास मदत होईल. व मापात पाप करणाºया दोषींवर कारवाई.मापात पाप करणाºयांना मिळतेय बळजिल्ह्यात वजने व मापांची अचानकपणे तपासणी करण्यात येते. तत्पूर्वी नोंदणीकृत व्यापाºयांना त्यांच्या मापांची तपासणी करून घ्यावी लागते. त्यासाठी या विभागाकडून स्वतंत्र कॅम्प आयोजित करण्यात येतात. परंतु बहूतांश व्यापारी त्याला प्रतिसाद देत नाहीत. अशा व्यापाºयांवर विभागातर्फे कारवाई केली जाते. ग्राहक संरक्षणाच्या दृष्टिकोनातून हिंगोली येथील वैधमापन शास्त्र विभागास पूर्णवेळ अधिकाºयाची आवश्यकता आहे. जेणेकरून मापात पाप करून ग्राहकांची लूट करणाºया दोषींविरूद्ध कारवाई होईल.पेट्रोलपंपावर अनेकदा कमी पेट्रोल टाकले जात असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. अनेकदा या कारणावरून वादही होतात. परंतु संबंधितांविरूद्ध या विभागातर्फे मात्र कारवाई होत नाही, हे विशेष.

टॅग्स :HingoliहिंगोलीMarketबाजार