शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

ड्राय डेच्या दिवशी दारु विकणाऱ्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 00:58 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शासनाचा सर्वत्र ड्राय डे असताना अवैध दारु विक्रेत्यांवर हिंगोलीसह चार ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाडी टाकून ८ हजार २६० रुपयाची दारु पकडली.

लोकमत न्यूज नेटवर्कवारंगा फाटा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शासनाचा सर्वत्र ड्राय डे असताना अवैध दारु विक्रेत्यांवर हिंगोलीसह चार ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाडी टाकून ८ हजार २६० रुपयाची दारु पकडली.ड्राय डे असताना काही ठिकाणी अवैधरीत्या दारु विक्री होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मिळाली. यावरून आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील येहळेगाव तुकाराम येथील पवनसिंह रघुसिंह ठाकूर (२९) हा आपल्या किराणा दुकानात देशी दारु विकत असताना पोलिसांनी १४४० रुपयांची दारु पकडली तर येथीलच संदीप गोविंद पवार (३५) हा तलाठी भवनाजवळील झोपडीत देशी दारु विकत असताना १८०० रुपयाची दारु पकडली. तसेच वारंगा फाटा येथील जय भवानी ढाब्याच्या पाठीमागे भीमराव बबन लोखंडे (२४, रा. डिग्रस बु) हा देशी व विदेशी दारु विकताना २१४० रुपयाची दारु पकडली. पोलीस नायक विशाल घोळवे, पोहकॉ गणेश राठोड यांच्या फिर्यादीवरून आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्य एका ठिकाणी हिंगोली शहर येथे रामू पवार हा २८८० रुपयाची अवैध दारु विक्री करत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडले. सर्व चारही ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक एस.के. केंद्रे, पोहेकॉ विलास सोनवणे, गणेश राठोड, पोना संभाजी लकुळे, विशाल घोळवे, पंचलिंगे, चालक रामजी सुब्रवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली. स्थानिक गुन्हे शाखेच्या एकाच दिवशी चार ठिकाणी केलेल्या धाडसत्राने अवैध दारु व अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. जिल्ह्यात विविध ठिकाणी पोलीस प्रशासना तर्फे कारवाई करण्यात आली.

टॅग्स :Hingoli policeहिंगोली पोलीसalcohol prohibition actदारुबंदी कायदा