सेनगाव तालुक्यातील भंडारी येथे पोलिसांनी एकाकडून अडीच हजार रूपये किमतीचे गावठी हातभट्टी दारू बनविण्याचे २५ लिटर सडके रसायन जप्त केले. याप्रकरणी पोहेकॉ सखाराम जाधव यांचे फिर्यादीवरून बाबूलाल लक्ष्मण राठोड याच्याविरुद्ध सेनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. दुसरी कारवाई औंढा तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथे करण्यात आली. येथे विश्वनाथ जोरसिंग पवार (रा. ब्राह्मणवाडा) याच्याकडून ९७५ रुपये किमतीच्या देशी दारूच्या १५ बॉटल पोलिसांनी जप्त केल्या. याप्रकरणी पोलीस शिपाई ज्ञानेश्वर गोरे यांच्या फिर्यादीवरून औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. वसमत तालुक्यातील कुरुंदा येथे राजेश बाबूराव दवणे (रा. गणेशनगर कुरुंदा) याच्याकडून पोलिसांनी १२०० रुपये किमतीच्या देशी दारूच्या २० बॉटल जप्त केल्या. याप्रकरणी पोलीस नाईक बालाजी जोगदंड यांच्या फिर्यादीवरून कुरूंदा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. सेनगाव तालुक्यातील पुसेगाव येथे दोघांकडून देशी दारूच्या बॉटल जप्त करण्यात आल्या. पुसेगाव येथील बसस्टँडजवळ प्रकाशलाल तुळशीराम जैस्वाल याच्याकडून १२०० रुपये किमतीच्या देशी दारूच्या २० बॉटल जप्त केल्या. याप्रकरणी पोलीस अमलदार हेमंत दराडे यांच्या फिर्यादीवरून नर्सी नामदेव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. तसेच देवीलाल परमेश्वरलाल जैस्वाल याच्याकडून दीड हजार रुपये किमतीच्या देशी दारूच्या २५ बॉटल पोलिसांनी जप्त केल्या. याप्रकरणी पोलीस अमलदार नंदकिशोर महाजन यांच्या फिर्यादीवरून नर्सी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक पोटे करीत आहेत.
जिल्हाभरात अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:33 IST