शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

औद्योगिक वीज ग्राहकांसाठी ‘अभय योजना’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 23:54 IST

वीजबिल न भरल्यामुळे कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित केलेल्या महावितरणच्या औद्योगिक ग्राहकांना दिलासा देण्यासाठी ‘अभय योजना’ जाहीर केली आहे. योजनेत सहभागी होणाऱ्या औद्योगिक ग्राहकांच्या मूळ थकबाकीवरील व्याज व विलंब आकार माफ केले जाणार आहे. राज्यात सुमारे ९७ हजार ४६४ औद्योगिक ग्राहकांना या योजनेचा लाभ घेता येणार असून त्याद्वारे २३१ कोटीचा व्याज व विलंब आकारावरील सवलत मिळवता येईल. हिंगोली जिल्ह्यात १ हजार ६९७ औद्योगिक वीजग्राहक आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : वीजबिल न भरल्यामुळे कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित केलेल्या महावितरणच्या औद्योगिक ग्राहकांना दिलासा देण्यासाठी ‘अभय योजना’ जाहीर केली आहे. योजनेत सहभागी होणाऱ्या औद्योगिक ग्राहकांच्या मूळ थकबाकीवरील व्याज व विलंब आकार माफ केले जाणार आहे. राज्यात सुमारे ९७ हजार ४६४ औद्योगिक ग्राहकांना या योजनेचा लाभ घेता येणार असून त्याद्वारे २३१ कोटीचा व्याज व विलंब आकारावरील सवलत मिळवता येईल. हिंगोली जिल्ह्यात १ हजार ६९७ औद्योगिक वीजग्राहक आहेत.राज्यातील ज्या औद्योगिक ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित केला आहे. अशा ग्राहकांसाठी महावितरणने १ जून ते ३१ आॅगस्ट २०१८ या तीन महिन्यांसाठी अभय योजना जाहीर केली आहे. ज्या वीजग्राहकांचा वीजपुरवठा ३१ डिसेंबर २०१७ पूर्वी कायमस्वरुपी खंडित केला आहे, अशा ग्राहकांनी योजनेच्या पहिल्या महिन्यात मूळ थकबाकीची रक्कम भरल्यास त्यांना १०० टक्के व्याज व विलंब आकाराची सवलत मिळणार आहे. १ जुलै ते ३१ आॅगस्ट २०१८ दरम्यान ग्राहकाने मूळ थकबाकीची रक्कम व व्याजाची २५ टक्के रक्कम भरली तर उर्वरित ७५ टक्के व्याज व १०० टक्के विलंब आकार माफ केला जाईल. न्यायालयीन प्रकरण १२ वर्षांपेक्षा अधिकचे असेल व न्यायालयाने डिक्रीची रक्कम दिली असेल तर संबंधित ग्राहकांनी ही रक्कम एकाच वेळी पूर्ण भरल्यास त्या ग्राहकांना १०० टक्के व्याजाची माफी मिळेल.तसेच जे न्यायालयीन प्रकरण १२ वर्षांपर्यंतचे आहे व न्यायालयाने डिक्रीची रक्कम दिली, अशा ग्राहकांनी एका टप्प्यात डिक्रीची रक्कम भरल्यास त्यांना ५० टक्के व्याजमाफीची सूट मिळेल. यासर्व प्रकरणात न्यायालयीन प्रक्रियेचा खर्च संबंधित ग्राहकाला करावा लागणार आहे. ग्राहकाला थकबाकीची रक्कम रोख व धनादेशाच्या या माध्यमातून करता येईल. थकबाकीची रक्कम भरल्यानंतर महावितरणच्या नियमानुसार संबंधित ग्राहकाला वीजजोडणी देण्यात येईल. योजनेच्या लाभासाठी आवाहन करण्यात आले.अभय योजनेत ज्या ग्राहकाला आपल्या थकबाकीच्या रकमेची माहिती घ्यावी. ग्राहकांनी महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळ ६६६ लिंकवर जावून ग्राहक क्रमांक, बिलिंग युनिट टाकल्यास योजनेची व ग्राहकाच्या थकबाकीची संपूर्ण माहिती उपलब्ध होते. योजनेत १ जूनपासून ग्राहकांना सहभागी होता येणार आहे.

टॅग्स :Hingoliहिंगोलीmahavitaranमहावितरण