शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ७०० कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 01:09 IST

विविध मागण्यांसाठी राष्ट्रीयकृत बँकांतील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी ३० मे रोजी पुकारलेल्या संपामुळे जिल्ह्यातील २० बँकातील सुमारे ७०० कोटी रुपयांचा व्यवहार ठप्प झाला आहे़  बँकेच्या वेतन आयोग व इतर मागण्यांसह आय.बी.ए.च्या चुकीच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : विविध मागण्यांसाठी राष्ट्रीयकृत बँकांतील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी ३० मे रोजी पुकारलेल्या संपामुळे जिल्ह्यातील २० बँकातील सुमारे ७०० कोटी रुपयांचा व्यवहार ठप्प झाला आहे़  बँकेच्या वेतन आयोग व इतर मागण्यांसह आय.बी.ए.च्या चुकीच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला होता.हिंगोली जिल्ह्यात एकूण २० राष्टÑीयीकृृत बँका अ असून त्यांच्या जवळपास ११0 शाखा आहेत. या सर्व बँकेतील अधिकारी व कर्मचाºयांनी पगारवाढीसह इतर मागण्यांसाठी संप पुकारला़ दरम्यान, इंडियन बँक असोसिएशन व केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. तसेच शहरातील मुख्य मार्गावरुन मोर्चा काढून बँकेच्या मागण्यांसाठी वेतन आयोगाला गती व भरीव वाढीची दाद मागण्यासाठीही एल्गार केला. मुख्य प्रतिनिधींनी बँक कर्मचाºयांची सध्याची परिस्थिती व इतर बाबींवर मार्गदर्शन केले़  संपामध्ये जवळपास जिल्ह्यातील ५०० च्या वर अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते. हिंगोली येथे नितीन घुगे, निखिल पांडे, जयबीर सिंग, मदन कुमार, ए. सी. दीक्षित, कल्पना डफळे, रजनीकांत निंबाळकर, साई गणेश आंबेकर, अशोक मोरे, एस. एम. कोल्हे, विजय कावरखे, जी. डी. मुलंगे, मदन रटनालू आदी कर्मचाºयांचा सहभा होता.बँकांचे व्यवहार विस्कळीतराष्टÑीयकृत बँका बंद असल्यातरी स्थानिक बँकाचे व्यवहार सुरु होते. मात्र त्या बँकांच्याही व्यवहारावर मोठा परिणाम झाला होता. आरटीजीएस, ट्रान्सफर, चेक क्लिअरसन्स या सेवा विस्कळीत झाल्या होत असल्याने मात्र ग्राहकांची एकच धावपळ उडत होती. आता ३१ मे रोजीही संप राहणार असल्याने ग्राहकांची तर चांगलीच तारांबळ उडण्याची शक्यता दिसून येत आहे.औंढा : येथील राष्टÑीयीकृत बँकेचे कर्मचारी, बँक कर्मचारी युनियनच्या वतीने दोन दिवस पुकारलेल्या देशव्यापी संपात सहभागी झाल्याने दिवसभर बँका कुलूपबंद होत्या. त्यामुळे दैनंदिन व्यवहारासाठी लागणारे पैसे काढण्यासाठी बँकेत आलेल्या नागरिकांचा मात्र हिरमोड झाला. बँक आॅफ महाराष्टÑ, ग्रामीण महाराष्टÑ बँक, इंडिया बँक, एसबीआय अशा विविध राष्ट्रीय बँकांच्या शाखा येथे आहेत. बुधवारी या सर्व बँकेचे कर्मचारी संपात सहभागी झाल्याने बँकेचे कामकाज दिवसभर ठप्प होते. आज संपाचा पहिला दिवस असून पगारवाडीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी गुरुवारीही बँका बंद राहणार असल्याने व्यवहार ठप्प झाले.

टॅग्स :HingoliहिंगोलीStrikeसंप