शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
3
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
4
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
5
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
6
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
7
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
8
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
9
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
10
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
11
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
12
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
13
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
14
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
15
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
16
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

सुराणा नगरातील दरोडा प्रकरणी ७ संशयित ताब्यात ; चाैघांचा शाेध सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2021 18:55 IST

हिंगोली शहरालगत असलेल्या सुराणा नगरात राज्य राखीव दलाचे जवान आर. व्ही. त्रिमुखे यांच्या घरी १२ ते १३ दरोडेखोरांनी ७ मार्चला दरोडा टाकला.

हिंगोली : सुराणा नगरातील दरोडा प्रकरणी हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ११ मार्च राजी पहाटे जालना येथे धरपकड मोहीम राबवून ७ संशयितांना ताब्यात घेतले. अन्य चौघांचा शोध सुरु आहे. यामुळे गुन्हा उघडकीस येणार असल्याचे पोलीस विभागाच्या सुत्रांनी सांगितले.

हिंगोली शहरालगत असलेल्या सुराणा नगरात राज्य राखीव दलाचे जवान आर. व्ही. त्रिमुखे यांच्या घरी १२ ते १३ दरोडेखोरांनी ७ मार्चला दरोडा टाकला. यामध्ये घरातील महिला व पुरुषांच्या गळ्यावर तलवार ठेऊन दरोडेखोरांनी सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा सव्वा दोन लाख रुपयांचा ऐवज लांबविला होता. याप्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

घटनास्थळावर कुठलाही पुरावा नसतांना दरोडेखोरांना पकडण्याचे पोलिसांसमोर माेठे आव्हान उभे होते. दरम्यान, पोलीस अधिक्षक राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधिक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलीस अधिक्षक यतीश देशमुख, उपाधिक्षक विवेकानंद वाखारे यांनी तपास पथके स्थापन केली. पोलीस अधिक्षक कलासागर यांनी हिंगोली ग्रामीण पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेला संयुक्तपणे तपास करून सायबर सेलची मदत घेण्याच्या सुचनाही दिल्या.

त्यानुसार गुन्हे शाखेचे निरीक्षक उदय खंडेराय, सहाय्यक पोलीस निरीक्षक बळीराम बंदखडके, उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, किशोर पोटे यांच्या पथकाने चार दिवसांपासून मराठवाड्यासह विदर्भात संशयीतांची चौकशी सुरु केली. या प्रकरणात जालना येथील काही जण सहभागी असल्याची माहिती मिळाल्यावरून हे पथक जालना येथे पोहोचले. दरम्यान, ११ मार्च राेजी पहाटे अडीच वाजल्यापासून पोलिसांच्या पथकाने जालना पोलिसांच्या मदतीने विविध ठिकाणी छापे टाकून ७ संशयीतांना ताब्यात घेतले. तर अन्य चौघांचा अद्यापही शोध सुरु आहे. ताब्यात घेतलेल्या संशयीतांच्या घरझडती करण्यात आली.

या सर्वांना हिंगोली येथे आणल्यानंतर त्यांची सखोल चौकशी केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्या चौकशीतून गुुन्ह्याला वाचा फुटण्यास मदत होणार आहे. हिंगोलीत दरोडा टाकल्यानंतर फरार झालेल्या त्या संशयीत दरोडेखाेरांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या मोबाईलची तपासणी केली. त्यांच्या व्हॉटस्‌अपवर हिंगोलीच्या दरोड्याच्या बातम्या दिसून आल्या. त्यांनी या बातम्या एकमेकांना शेअर केल्याचे प्राथमिक तपासणीत आढळून आले आहे.

टॅग्स :RobberyचोरीCrime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोली