शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोली जिल्ह्यात ६० पीडितांना ‘मनोधैर्य’ योजनेचे बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 11:12 IST

अत्याचार पिडीत महिला व बालकांना आधार देऊन त्यांच्या पुनर्वसनासाठी शासनातर्फे सन २०१३ पासून मनोधैर्य योजना जिल्ह्यात राबविली जात आहे. योजनेअंतर्गत पीडितांना २ ते ३ लाखांपर्यंत अर्थसहाय्य केले जात होते. आता सुधारित मनोधैर्य योजनेअंतर्गत शासनाने पीडितांच्या लाभाच्या रक्कमेत वाढ केली असून १० लाखापर्यंत अर्थसहाय्य केले जाणार आहे.

हिंगोली : अत्याचार पिडीत महिला व बालकांना आधार देऊन त्यांच्या पुनर्वसनासाठी शासनातर्फे सन २०१३ पासून मनोधैर्य योजना जिल्ह्यात राबविली जात आहे. योजनेअंतर्गत पीडितांना २ ते ३ लाखांपर्यंत अर्थसहाय्य केले जात होते. आता सुधारित मनोधैर्य योजनेअंतर्गत शासनाने पीडितांच्या लाभाच्या रक्कमेत वाढ केली असून १० लाखापर्यंत अर्थसहाय्य केले जाणार आहे.

पीडित महिला, मुली आणि बालकांना मदतीचा हात देऊन त्यांना पुन्हा नव्या उमेदीने जीवन जगण्यासाठी ‘मनोधैर्य’ योजनेतून मदत केली जाते. आॅक्टोबर २०१३ पासून महिला व बालविकास अधिकारी कार्यालयातर्फे जिल्ह्यात योजने अंतर्गत ६० प्रकरणांना मंजुरी मिळाली. पीडितांना १ कोटी १९ लाख रूपये अर्थसहाय्य करण्यात आले. तर ११ प्रकरणांची मंजुरी प्रक्रिया सध्या सुरू असल्याची माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी व्ही. जी. शिंदे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली. पूर्वी ही प्रकरणे जिल्हाधिकारी यांच्याकडे होती. आता सदर प्रकरणे ही नवीन सुधारित शासन निणर्यानुसार जिल्हा विधी प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात आली आहेत.

अर्थसहाय्य : घटनेचे विवरणघटनेचा परिणाम स्वरूप मानसिक धक्का बसून महिलेस कायमचे मतिमंदत्व किंवा शारीरिक अपंगत्व आले असेल तर १० लाखांपर्यंत अर्थसहाय्य केले जात आहे. मंजूर रक्कमेपैकी ७५ टक्के रक्कम १० वर्षांसाठी पीडितेच्या नावे मुदतठेव म्हणून ठेवण्यात येईल.तर २५ टक्के रक्कमेचा धनादेश पीडितेस तत्काळ दिला जाईल. यामध्ये वैद्यकीय खर्चासाठी ३० हजार रूपये रक्कमेचा समावेश आहे. तसेच सामूहिक बलात्कार व अशा प्रकरणी महिलेस गंभीर व तीव्र स्वरूपाची शारीरिक इजा झाल्यास वरीलप्रमाणे योजनेचा लाभ दिला जाणार आहे.तसेच मयत महिला कुटुंबातील कमावती महिला असेल किंवा नसेल, बलात्काराच्या गुन्ह्यातील अन्य घटनांमध्ये पीडित महिला असेल तर ३ लाख रूपये अर्थसहाय्याची तरतूद करण्यात आली आहे.

पोक्सोअंतर्गत बालकांवरील लैंगिक अत्याचारपोक्सो अंतर्गत बालकांवरील लैंगिक अत्याचार, यामध्ये पीडित बालकास लिंगभेद न करता कायमस्वरूपी मतिमंदत्व किंवा अपंगत्व आल्यास १० लाख रूपये, बालकांवरील लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यातील अन्य घटनांमधील पीडित महिला असेल तर तीन लाख रुपये. अ‍ॅसिड हल्ला- या घटनेमध्ये पीडितांचा चेहरा विद्रुप झाल्यास कोणत्याही दृष्य भागाची हानी व कायमचे अपंगत्व आल्यास १० लाख रूपये, अ‍ॅसिड हल्याच्या गुन्ह्यातील अन्य घटनांमधील पीडित महिला असेल तर ३ लाख रूपये. यामध्ये मंजूर रक्कमेपैकी ७५ टक्के रक्कम १० वर्षांसाठी पीडितेच्या नावे मुदतठेव म्हणून ठेवण्यात येईल.२५ टक्के रक्कमेचा धनादेश पीडितेस तत्काळ दिला जाईल. यामध्ये वैद्यकीय खर्चासाठी ३० हजार रूपये रक्कमेचा समावेश आहे.