शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

सेंद्रिय शेतीतील उसाच्या रसविक्रीतून मिळवला सहा लाखांचा नफा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 19:54 IST

यशकथा : या प्रयोगातून त्यांनी इतर शेतकऱ्यांसमोर एक नवा आदर्श उभा केला आहे.

- दिलीप कावरखे ( हिंगोली )

सेंद्रिय शेती प्रयोगाद्वारे दीड एकरात जवळपास १६० मेट्रिक टन उसाचे उत्पन्न घेत रसविक्रीतून वर्षाला सहा ते साडेसहा लाखांचा निव्वळ नफा शेतकरी नामदेव कावरखे यांनी कमावला आहे. या प्रयोगातून त्यांनी इतर शेतकऱ्यांसमोर एक नवा आदर्श उभा केला आहे.

सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथील अल्पभूधारक शेतकरी नामदेव कावरखे यांनी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून ऊस शेती व रसविक्रीचा व्यवसाय गत तीन वर्षांपासून सुरूकेला. गोरेगाव येथील चौफुली मुख्य रस्त्यावरील कावरखे यांच्या सेंद्रिय ऊस रसवंतीला प्रवासी वाटसरू, ग्राहकांची मोठी पसंती मिळत आहे.

एका उसाचे वजन ४ ते ५ किलो असून एका उसापासून ते ८ ते १० ग्लास रस काढून प्रतिग्लास १० रुपये दराने विक्री करतात. सेंद्रिय ऊस लागवड व इतर व्यावसायिक खर्च वगळून वर्षाकाठी सहा ते साडेसहा लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.  

वयाची सत्तरी ओलांडलेले अल्पभूधारक शेतकरी नामदेव महादजी कावरखे यांनी विषमुक्त सकस आहाराच्या सेवनाने शरीराची सुदृढता कायम राखीत सेंद्रिय शेतीच्या हलाखीच्या परिस्थितीवर मातदेखील केली आहे. कावरखे यांच्याकडे एकूण सहा जनावरे आहेत. त्यात एक बैल जोडी, दोन गायी, वासरे या गुरांच्या शेणापासून तयार केलेले शेणखत तसेच विकत आणलेल्या गांडूळ खताच्या वापरातून गत तीन वर्षांपासून सेंद्रिय शेतीचा प्रयोग राबवीत आहे.

उन्हाळ्यात ते स्वत: लिंबाच्या लिंबोळ्या गोळा करून निमअर्क तयार करून ठेवतात. लिंबोळी अर्काचा वापर पावसाळा व हिवाळ्यात पिकांवर फवारणीसाठी करतात. सेंद्रिय पद्धतीने दीड एकर शेतात ऊस लागवडीतून १६० मेट्रिक टन ऊस उत्पादन घेतले आहे. कावरखे यांनी मुले दीपक आणि अनथा यांना रसवंतीचा व्यवसाय सुरू करून दिला आहे. शेतातील ऊस उन्हाळी हंगामात रसवंतीवर आणून रस काढून त्याची ते विक्री करतात.

कावरखे यांच्याकडे एकूण ३ एकर शेती आहे. गुरांपासून मिळणारे शेण चांगल्या प्रकारे कुजवून व त्यात गांडूळ खत मिसळून ते शेतीसाठी वापरतात. यंदा त्यांनी उसात अंतरपीक म्हणून मुगाची पेरणी केली होती. त्यातून एकरी दोन क्विंटल मुगाचे उत्पन्न मिळविले आहे, तर एक एकरामध्ये गव्हाची पेरणी केली आहे.

सेंद्रिय खताच्या वापरातून गतवर्षी एका एकरात २२ क्विंटल गहू झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच अर्ध्या एकरमध्ये ६ पोते सोयाबीन आणि ४ पोते तुरीचे उत्पन्न घेतले आहे. ते सेंद्रिय शेतीत पिकवलेल्या गव्हाचा तसेच तूर डाळीचा घरी खाण्यासाठी वापर करतात. विषविरहित सेंद्रिय अन्नसेवनाने त्यांच्या कुटुंबियांचे आरोग्य सुदृढ असल्याचे ते म्हणाले. सेंद्रिय अन्नधान्यामुळे त्यांच्यासह त्यांच्या ९० वर्षीय आईचे आरोग्य ठणठणीत असून अद्याप त्यांचा एकही दात पडला नाही. त्यांच्या शेतात १० लिंबोनीची झाडे असून सेंद्रिय  खताच्या मात्रेमुळे बाराही महिने झाडांना लिंबू लगडलेले असतात. 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र