शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

इसापूर धरणात ५९.८८ टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:29 IST

सध्या उन्हाचा कडाका वाढला असून, पाण्याच्या पातळीत घट झाली आहे. तालुक्यालगत असलेल्या इसापूर धरणात सध्या ५९.८८ टक्के जलसाठा उपलब्ध ...

सध्या उन्हाचा कडाका वाढला असून, पाण्याच्या पातळीत घट झाली आहे.

तालुक्यालगत असलेल्या इसापूर धरणात सध्या ५९.८८ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. या धरणाची पाण्याची पातळी ४३६.७९० मीटर आहे. धरणात उपयुक्त पाणीसाठा ५७७.३३३ द.ल.घ.मी. आहे. धरणात तालुक्यातील १४ गावे गेली आहेत. परंतु, या धरणाचा म्हणावा तसा फायदा तालुक्याला होत नाही.

सात वर्षांनंतर पहिल्यांदाच यावर्षी हे धरण शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे सध्या धरणात बऱ्यापैकी पाणीसाठा उपलब्ध आहे. धरणाचे क्षेत्रफळ नऊ हजार ६३४ हेक्‍टर आहे. २०१३ मध्ये धरण शंभर टक्के भरले गेेले. त्यानंतर २०२० मध्येच धरण शंभर टक्के भरले होते.

उन्हाळी पिकांना पाणी देणे सुरू

सद्य:स्थितीत उन्हाळी पिकांना उजव्या व डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा कमी होत आहे. यावर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे इसापूर धरण तुडुंब भरले होते. त्यामुळे धरणातून पैनगंगा नदीद्वारे पाणी सोडण्यात आले. काही दिवसांपूर्वी उन्हाळी पिकांसाठी पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी केली होती. शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करून इसापूर धरणाच्या उजव्या व डाव्या कालव्यातून उन्हाळी हंगामासाठी पाणी सोडण्यात येत असल्याची माहिती कनिष्ठ अभियंता एस. एम. सूर्यवंशी यांनी दिली.

कळमकोंडा, देवदरीने तळ गाठला

गत पंधरा-वीस दिवसांपासून उन्हाची तीव्रता अधिक वाढली आहे. प्रखर उन्हामुळे तालुक्यातील कळमकोंडा व देवदरी तलावांनी सद्य:स्थितीत तळ गाठला आहे. उन्हाळा संपायला अजून दीड महिना बाकी आहे. शहर व तालुक्यात कुठे पाईपलाईनद्वारे गळती होत असेल तर त्याबाबत प्रशासनाला कळवावे. तसेच नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा, असे आवाहन तालुका प्रशासनाने केले आहे.