शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

जात वैधता पडताळणीत ५९४३ प्रकरणे निकाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 00:31 IST

जिल्हा जातपडताळणी समितीकडे मागील दीड वर्षात ६३४७ प्रकरणे प्राप्त झाली होती. एप्रिल २०१७ ते मार्च २०१८ पर्यंत एकूण ५९४३ प्रकरणे निकाली काढण्यात असून उर्वरित ४०४ पैकी १२१ प्रकरणे प्रलंबित असल्याची माहिती जिल्हा जात पडताळणी समितीतर्फे देण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्हा जातपडताळणी समितीकडे मागील दीड वर्षात ६३४७ प्रकरणे प्राप्त झाली होती. एप्रिल २०१७ ते मार्च २०१८ पर्यंत एकूण ५९४३ प्रकरणे निकाली काढण्यात असून उर्वरित ४०४ पैकी १२१ प्रकरणे प्रलंबित असल्याची माहिती जिल्हा जात पडताळणी समितीतर्फे देण्यात आली.हिंगोली येथे २१ नोव्हेंबर २०१६ पासून जिल्हा जात वैधता पडताळणी समितीची स्थापना करण्यात आली. शासकीय सेवेतील अधिकारी कर्मचारी असोत किंवा निवडणुकीतील उमेदवार व महाविद्यालयीन विद्यार्थी आदींना विविध शासकीय कामांसाठी जात वैधता प्रमाणपत्र अनिवार्य आहे. जात वैधता प्रमाणपत्रांसाठी अर्जदाराला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करूनही जात वैधता प्रमाणपत्र मिळत नसल्याच्या अनेकांच्या तक्रारी आहेत. परंतु यासाठी आवश्यक कागदपत्रे व वेळीच त्रुटींची पूर्तता केल्यास अर्ज लवकर निकाली काढल्या जाते, असा या कार्यालयाचा दावा आहे. शिवाय संबधित अर्जदाराला एसएमएसद्वारे वेळोवेळी कळविले जाते. तो मिळताच खात्री करून घेतल्यास व कागदोत्रांची पूर्तता केल्यास जात वैधता पडताळणीच्या कामात व्यत्यय येत नाही, अशी माहिती जात वैधता पडताळणी समितीचे उपायुक्त भारत केंद्रे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व इतर मागास प्रवर्गातील व्यक्तींना जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक असल्याने या कामासाठी कार्यालयाचे खेटे घ्यावे लागातात. परंतु येथील रिक्त पदे, व अध्यक्ष नसल्यामुळे याचा परिणाम कार्यालयीन कामकाजावर होत आहे. अधिक माहितीकरिता ६६६.ुं१३्र.ेंँं१ं२ँ३१ं.ॅङ्म५.्रल्ल या संकेतस्थळास भेट देण्याचे आवाहन करण्यात आले.अध्यक्षविना कामकाज : रिक्त पदांचे ग्रहणमागील दीड वर्षापासून जिल्हा जातपडताळणी समितीला पूर्णवेळ अध्यक्ष मिळाला नाही. शिवाय येथील १ डीवायएसपीं, २ क्लार्क, १ स्टेनोग्राफर व १ शिपाई ही पदे रक्त आहेत. तरे एकूण ६ कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून त्यावर कामकाज सुरू आहे.जिल्हा जात पडताळणी कार्यालयात अनुभवी शासकीय कर्मचाºयांचा अभाव आहे. त्यामुळे कार्यालयीन कामे करताना अडचणी येतात. शिवाय प्रक्रिया पार पाडताना अनेक चुकाही होतात.भूल-थापांना बळी पडू नका- केंद्रे४अर्जदारांनी कोणाच्याही भूल-थापांना बळी पडू नये, जात वैधता पडताळणी प्रमाणपत्रासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी. तसेच यादरम्यान आढळून आलेल्या त्रुटींची पूर्तता वेळेत केल्यास पुढील प्रक्रिया सुरळीत पार पाडल्या जाते. त्यामुळे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी कोणाकडेही आपली मूळ कागदपत्रे किंवा इतर कार्यालयीन कामे सोपवू नयेत. एकाच जातीचा दुसºया जातीत जाऊन जातपडताळणी करून लाभ घेणारे बोगस प्रकरणेही येतात. त्यामुळे योग्य पडताळणी केली जाते. याचे प्रमाण केवळ दोन टक्के आहे. दोषी आढळून आल्यास वरिष्ठ कार्यवाही करतात.

टॅग्स :Caste certificateजात प्रमाणपत्रGovernmentसरकार