शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

‘त्या’ शाळांचे ४९ % विद्यार्थी इंग्रजीला गायब!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 00:14 IST

तालुक्यातील कापडसिनगीत अचानक मोठ्या विद्यार्थीसंख्येसह अवतरलेल्या दोन विद्यालयांचे दहावीच्या परीक्षेचे केंद्र सेनगावात आले अन् परीक्षा देणाºयांची संख्या रोडावली होती. त्यातच शिक्षण विभागानेही कॉपीमुक्तीची सक्ती केल्याने अनुपस्थिती ४९ टक्क्यांवर पोहोचली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसेनगाव : तालुक्यातील कापडसिनगीत अचानक मोठ्या विद्यार्थीसंख्येसह अवतरलेल्या दोन विद्यालयांचे दहावीच्या परीक्षेचे केंद्र सेनगावात आले अन् परीक्षा देणाºयांची संख्या रोडावली होती. त्यातच शिक्षण विभागानेही कॉपीमुक्तीची सक्ती केल्याने अनुपस्थिती ४९ टक्क्यांवर पोहोचली आहे.तालुक्यातील कापडसिनगी येथील रेखेबाबा माध्यमिक विद्यालय व संत गजानन विद्यालय या दोन विद्यालयांत कोणत्याही भौतिक सुविधा नसताना तब्बल ६९४ विद्यार्थ्यांचे दहावीला प्रवेश झाले होते. एवढ्या विद्यार्थीसंख्येमुळे परीक्षा केंद्राचा प्रश्न निर्माण झाला होता. सेनगावात येवले विद्यालय व शिवाजी विद्यालयात केंद्र दिले. त्यामुळे आधीच अनेकांनी काढता पाय घेतला. हिंदी विषयाच्या पेपरला ३८ टक्के विद्यार्थी गैरहजर होते. गुरुवारी इंग्रजीच्या पेपरला तर विक्रमी ४९ टक्के विद्यार्थ्यांची गैरहजेरी दिसली. शिक्षणाधिकारी दीपक चवळे हेच केंद्रावर तळ ठोकून असून कॉपीला थारा दिला जात नसल्याने गणित बिघडले आहे. शिवाजी माध्यमिक विद्यालयात एकूण २९८ पैकी १४५ विद्यार्थांनी पेपर दिला तर १५५ विद्यार्थी गैरहजर होते. येवले विद्यालयात एकुण ३९२ पैकी २०७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तर १८५ विध्यार्थी गैरहजर होते. दोन्ही विद्यालयात गैरहजर विद्यार्थांची टक्केवारी ४९ टक्के म्हणजे निम्मे विद्यार्थी गैरहजर राहिले आहेत. हा प्रकार लक्षात घेता पासिंग सेंटरच्या मुळावरच घाव बसल्याचे दिसून येत असून पुढे खरेच यात काही कारवाई होईल का, हा प्रश्नच आहे.