शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

जनसुविधाची ४ कामे सुरूच नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 00:34 IST

यंदा जनसुविधा योजनेतील ४५ कामे सुरू करण्यासाठी निधी वितरित करण्यात आला असला तरीही गतवर्षीचीच ४ कामे अजून सुरू झाली नसून ५ कामे आताही निविदा स्तरावरच आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : यंदा जनसुविधा योजनेतील ४५ कामे सुरू करण्यासाठी निधी वितरित करण्यात आला असला तरीही गतवर्षीचीच ४ कामे अजून सुरू झाली नसून ५ कामे आताही निविदा स्तरावरच आहेत.हिंगोली जिल्ह्यात जनसुविधा योजनेत २0१६-१७ या वर्षात ७२ कामे मंजूर झाली होती. यासाठी ३.६७ कोटी रुपयांचा निधी मंजूर होता. तर ३.0२ कोटी रुपयांचा निधी पंचायत समिती स्तरावर वितरित करण्यात आला आहे. यामध्ये हिंगोली-१३, वसमत-१४, कळमनुरी-१४, सेनगाव-१५ व औंढा १६ अशी तालुकानिहाय कामांची संख्या आहे. यापैकी केवळ एक काम १२ लाखांचे होते. उर्वरित ५ लाखांची कामे होती. यात ३९ कामे पूर्ण झाली असून या कामांवर १.२३ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. तर २४ कामे अजूनही सुरूच आहेत. ही कामे पूर्ण झाली नाहीत. यामध्ये हिंगोलीत ५, वसमत-७, कळमनुरी-३, सेनगाव-४, औंढा नागनाथ-५ अशी तालुकानिहाय अजूनही पूर्ण न झालेल्या कामांची संख्या आहे. तर पाच कामे निविदा स्तरावर आहेत. यापैकी एक काम वसमत तालुक्यातील तर तब्बल चार कामे सेनगाव तालुक्यातील आहेत. विजेष म्हणजे वसमत तालुक्यातील तीन कामे व कळमनुरी तालुक्यातील १ काम तर अजूनही सुरूच झाले नाही.आता मार्च एण्ड जवळ आला आहे. मार्च महिन्यात ही कामे पूर्ण न झाल्यास हा निधी परतीचा मार्ग धरू शकतो. मात्र तरीही याबाबत अनेक ग्रामपंचायती गंभीर दिसत नाहीत. पंचायत विभागाने याबाबत पंचायत समित्यांना कळविले असले तरीही यातील पाच कामेच निविदा स्तरावर आहेत. उर्वरित कामांची अजूनही प्रक्रियाच नाही. शिवाय सुरू असलेली २४ कामेही पूर्ण करण्यासाठी एवढाच महिना शिल्लक असून त्याला गती देण्याची गरज आहे.सीईओंचा आढावा : कामे गतिमान करामार्च महिना सुरू झाला असल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी एच.पी.तुम्मोड यांनी आज जि.प.त बैठक घेतली. यात विविध विभागाची कोट्यवधीची कामे अजूनही निविदा स्तरातच लटकलेली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आली. तर अनेक विभागांची ही प्रक्रियाही अजूनही पूर्ण झाली नसल्याचे आढळून आलेआहे. बांधकाम विभागाच्या विविध कामांच्या निविदा अजूनही निघालेल्या नाहीत. याबाबत तुम्मोड यांनी संबंधितांना कडक सूचना दिल्या. तर मार्च एण्डपर्यंत सर्व योजनांचा निधी खर्च व्हावा, निधी परत जावू नये, यासाठी बजावले आहे.विविध विभागांच्या अनेक योजनांच्या निधीबाबत अजूनही काहीच नियोजन नसल्याचे चित्र असून दोन वर्षांची मुदत संपणारा निधीही मार्च एण्डलाच खर्च करण्याची परंपरा कायम दिसत आहे.