शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

२९ हजार हेक्टर रबीचे नुकसान

By admin | Updated: March 4, 2015 15:40 IST

खरीप /हंगाम वाया गेल्यानंतर रबीवर उरलेल्या आशाही अवकाळी पावसाने मावळल्या.

 हिंगोली : /खरीप /हंगाम वाया गेल्यानंतर रबीवर उरलेल्या आशाही अवकाळी पावसाने मावळल्या. ५0 टक्क्यांच्या आत ५५ पैकी २९ हजार ८१३ हेक्टरवर हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावला. गतवर्षी गारपिटीने घाला घातला होता. जिल्ह्यात १ लाख २६ हजार २१0 पैकी ५५ हजार ५७0 हेक्टरवर रबीची पेरणी झाली होती. प्रमुख पीक असलेल्या हरभर्‍याची काढणी सुरू होती. एकूण पिकांपैकी ६0 टक्क्यांवर असलेला हरभरा अनेक ठिकाणी भुईसपाट झाला. कापलेल्या ठिकाणी तर मोड फुटण्याची वेळ आली. ज्वारी आणि गव्हाची अवस्था सारखीच झाली. दाणे धरल्यामुळे दोन्ही पिके काळी पडून नुकसानीत अधिक वाढ झाली. दोन्ही पिके झोपली असल्याने अन्नद्रव्य शेंड्यापर्यंत पोहोचणार नाहीत. परिणामी, दाणे भरणार नाहीत आणि काळवंडणारही आहेत. करडई, सुर्यफूल इतर पिकांनाही मोठा फटका बसला. पिके अंतिम टप्प्यात असताना सलग दुसर्‍यावर्षी पावसाने घाला घातला. मुख्यमंत्र्यांनी नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. जिल्ह्याधिकार्‍यांनी महसूल आणि कृषी विभागाला सूचना दिल्या. त्यानुसार जिल्ह्यात फळ आणि इतर पिके मिळून २९ हजार हेक्टरचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज काढला. प्रामुख्याने कळमनुरी आणि हिंगोली तालुक्यात सर्वाधिक नुकसानीला सामोरे जावे लागले. औंढा आणि सेनगाव तालुक्यात अनुक्रमे ७८३३ आणि ६0१२ हेक्टरवर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला असला तरी मदतीचे चित्र अस्पष्ट आहे. /(प्रतिनिधी) 

उभे पीक आडवे.. :हिंगोली कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा परिसरातही मोठा पाऊस झाला. त्यात सर्वच पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. त्यातील गहू झोपी गेल्याचे दृश्य. ५0 टक्क्यांपुढे नुकसान नाही- गतवर्षी झालेल्या गारपिटीत ५0 टक्क्यांच्या पुढे नुकसान अधिक असल्यामुळे फुल नाही फुलांची पाकळी शेतकर्‍यांची हाती पडली. आता गारपीट नसल्यामुळे पावसाने नुकसानी तीव्रता लक्षात घेण्यासाठी सर्व्हेक्षण केले. ५0 टक्क्यांपुढे एकाही हेक्टरवर नुकसान झालेले एकही हेक्टर नाही. डोंगरकडा परिसरात नुकसान- डोंगरकडा : कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा परिसरात वरूड, भाटेगाव, हिवरा, जवळा पांचाळ, वडगाव, रेडगाव, वसफळ, जामगव्हाण, सुकळीवीर आदी गावांमध्ये अवकाळी पाऊस झाला. त्यात १ मार्च रोजी सकाळी ३ च्या सुमारास झालेल्या पावसाने गहू, हरभरा, ज्वारी हे पिकांचे नुकसान झाले. आंब्याला फटका, संत्रीची नोंद नाही- सलग पाच वर्षांपासून संकरित आणि परजिल्ह्यातील आंब्यावर रसाची मदार आहे. यावेळीही मोहोर जोरात आला असताना पावसाने तो गळाला. त्यात वसमत आणि हिंगोली वगळता तीन तालुक्यांत नुकसानीची नोंद केली. मात्र हिंगोली तालुक्यात कमी प्रमाणात का होईना असलेली संत्र्याच्या नुकसानीची नोंद नाही. इतर पिकांत डाळिंबाचे १९ हजारांवर नुकसान दाखवले. द्राक्ष, आवळा, चिकू, पेरूचे कॉलम नील असताना संत्र्यांच्या नुकसानीचा कॉलमही नाही आणि नुकसानीचा उल्लेख नाही. त्यामुळे अस्मानीबरोबर सुलतानी संकटही संत्रा उत्पादकांवर ओढवले आहे.