शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

दंगलप्रकरणी २४ जणांना दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 23:42 IST

सन २०१० मध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान दोन गटांत दंगल झाली होती. यातील दोन्ही गटांतील २४ आरोपींना शुक्रवारी प्रथम न्यायालयाचे न्यायाधीश एस.पी.आडे यांनी दंगलीत दोषी ग्राह्य धरून प्रत्येकी १५०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. यामध्ये दोन विद्यमान नगरसेवकांचा समावेश आहे. निकाल देणार असल्याने न्यायालयात व परिसरात सशस्त्र पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कऔंढा नागनाथ : सन २०१० मध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान दोन गटांत दंगल झाली होती. यातील दोन्ही गटांतील २४ आरोपींना शुक्रवारी प्रथम न्यायालयाचे न्यायाधीश एस.पी.आडे यांनी दंगलीत दोषी ग्राह्य धरून प्रत्येकी १५०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. यामध्ये दोन विद्यमान नगरसेवकांचा समावेश आहे. निकाल देणार असल्याने न्यायालयात व परिसरात सशस्त्र पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.औंढा नागनाथ येथे २३ सप्टेंबर २०१० रोजी रात्री १२.३० वाजता गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान दंगल उसळली होती. यात तत्कालीन पोलीस निरीक्षक सी.पी.काकडे व चार पोलीस कर्मचारी जखमी झाले होते. याप्रकरणी दोन्ही समाजातील प्रत्येकी १२आरोपींवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला होता.सदरील प्रकरण औंढा प्रथमवर्ग न्यायालयात तब्बल ८ वर्षे चालले. सरकारी पक्षाच्या वतीने विशेष सहकारी अभियोक्ता अ‍ॅड. चेतन अग्रवाल यांनी बाजू मांडली होती. अंतिम युक्तीवादानंतर न्यायाधीश एस.पी.आडे यांनी शुक्रवारी न्यायालयाचा निकाल दिला. यामध्ये विद्यमान नगरसेवक जकी काजी, अनिल देव यांच्यासह जियाउद्दीन काजी, शेख इजाज खालेद, शे.खाजा शे. इक्रोमोद्दीन, सरफराज पठाण, शफीयोद्दीन काजी, शमीकौद्दीन काजी, सलीम खतीब, शे. एकबाल खालेद, शे.जब्बार शे. खालेद, शे.जब्बार इब्राहिम, मनोज देशमुख, गजानन रेणके, गोकूळ काळे, सुंदर काळे, बबन सोनुने, सचिन देव, अमोल गोटरे, नागेश यन्नावार, विजय यकुतकर, मारोती राज व सर्व रा.औंढा यांनी न्यायालयात गावातील जातीय सलोखा कायम ठेवण्याची हमी सर्व आरोपींनी दिल.त्यांना प्रत्येकी १५०० रुपयांचा दंडाची शिक्षा ठोठावली आहे. यातील आरोपींनी हा दंड न भरल्यास त्यांना १५ दिवसांच्या साधा कारावासाची शिक्षा न्यायाधीश एस.पी.आडे यांनी दिली. आरोपींकडून वसूल दंडाची रक्कम ही जखमी पोलीस कर्मचाऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेश दिले आहे.शुक्रवारी दुपारी हा निकाल देण्यात येणार असल्याने येथे मोठी गर्दी जमली होती. मात्र पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केल्याने परिसरास छावणीचे स्वरुप आले होते.