यामध्ये हराळ, वरखेडा, केंद्रा, गोरेगाव, माळसेलू, खंडाळा, माळहिवरा ते प्ररामा ७ रुंदीकरणासह सुधारणेसाठी ५ कोटी व पुलासाठी ७५ लाख, प्रजिमा २२ ते जांभरुण आंध, पुसेगाव, जांभरुण बु., शिंदेफळ, आजेगाव, वाघजाळी, म्हाळशी, शेगाव ते जिल्हा सीमा प्रजिमा पूल व मोऱ्यांच्या बांधकामासह सुधारणा करण्यासाठी ४.५७ कोटी, हत्ता, उटी, केलसुला, कापडसिंगी, रामा २२७ च्या सुधारणेसाठी २.४० कोटी, जांभरुण आंध, पुसेगाव, पार्डी, बेलखेडा, आजेगाव, शेगाव ते जिल्हा सीमा प्रजिमा २८ यारस्त्यावर पूल व मोऱ्यांच्या बांधकामासह सुधारणा करणे २.६० कोटी, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, हिंगोली कार्यालय इमारत बांधकाम ७.१५ कोटी मंजूर झाल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी सार्वजनिक बांधकाममंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे या कामांना मंजुरी मिळाल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे या भागातील रस्त्यांचा मोठा प्रश्न सुटला असून पुलांचा गंभीर असलेला प्रश्नही मार्गी लागल्याचे ते म्हणाले.
सहा रस्त्यांच्या कामांसाठी २२.४७ कोटी मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:30 IST