शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

ट्रकचालकास लुटणाऱ्या चोरट्यांकडून २१ मोबाइल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:55 IST

हिंगोली जिल्ह्यासह शेजारील जिल्ह्यात अनेक ट्रकचालक हे रात्रीला ढाब्यावर ट्रक लावून कॅबिनमध्ये झोपतात. ट्रकचालक झोपेत असताना कॅबिनमध्ये घुसून त्यांच्या ...

हिंगोली जिल्ह्यासह शेजारील जिल्ह्यात अनेक ट्रकचालक हे रात्रीला ढाब्यावर ट्रक लावून कॅबिनमध्ये झोपतात. ट्रकचालक झोपेत असताना कॅबिनमध्ये घुसून त्यांच्या मोबाइलसह इतर किमती साहित्य लांबविणारी टोळी सक्रिय झाली होती. ट्रकचालक व क्लिनर यांचा मोबाइल व पॉकेट चोरीला गेल्याची फिर्याद कुरूंदा पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला होता. याच वेळी ट्रकचालकांना लुटणारी टोळी भेंडेगाव (जि. नांदेड) येथे असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक एस.एस. घेवारे यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार करून रवाना करण्यात आले. तेथे सोनखेड पोलिसांच्या मदतीने संशयीत आरोपी माधव किशन भोसले(रा. भेंडेगाव ता. लोहा) यास ताब्यात घेतले. चोरीच्या घटनांबाबत त्याला विचारणा केली असता, त्याने धाब्यावर, पेट्रोलपंपावर मुक्कामी थांबलेल्या ट्रकचालकास लुटल्याची कबुली दिली, तसेच त्याचा भाऊ वैभव किशन भोसले, विलास रमेश शिंदे (रा. वसमत) हेही चोरीच्या घटनेमध्ये सहभागी असून, चोरलेले मोबाइल गावातील काही लोकांना विकल्याचेही त्याने सांगितले. दरम्यान, या पथकाने माधव किशन भोसले यास ताब्यात घेऊन ३ लाख १५ हजार रुपये किमतीच्या २१ मोबाइलसह १ हजार रुपये जप्त केले आहेत. पुढील तपासासाठी आरोपीस कुरूंदा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक एम.राकेश कलासागर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक यशवंत काळे, पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, किशोर पोटे, पोहेकाँ. संभाजी लेकुळे, भगवान आडे, किशोर कातकडे, विठ्ठल काळे, सायबर सेलचे जयप्रकाश झाडे, नीलेश हालगे, चालक प्रशांत वाघमारे, शेख जावेद यांच्या पथकाने केली.