शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

१७ लाखांची जाळपोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 00:14 IST

आंदोलनादरम्यान झालेल्या जाळपोळीच्या घटनांमध्ये १६ लाख ७७ हजारांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी दोन घटनांमध्ये २२ अनोळखी आरोपींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कआखाडा बाळापूर : आंदोलनादरम्यान झालेल्या जाळपोळीच्या घटनांमध्ये १६ लाख ७७ हजारांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी दोन घटनांमध्ये २२ अनोळखी आरोपींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दाती फाटा येथे २७ जुलै रोजी दुपारी ८ ते १० अज्ञात लोकांनी ट्रक अडवून पेट्रोल टाकून पेटवून दिला. यात तो ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला. या घटनेप्रकरणी ट्रकचालक महमद ताहिर महमंद तय्यब (रा. कालखेडा ता. फेरोजपूर झरिका जि. मेवात हरियाणा) याच्या फिर्यादीवरून १० अनोळखी इसमांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि ओमकांत चिंचोलकर करत आहेत. तर एरिगेशन कॅॅम्प येथील उर्ध्व पैनगंगा प्रकल्प विभागीय कार्यालय विभाग क्र. ४ मध्ये २७ जुलै रोजी दुपारी एक ते दिड वाजेच्या दरम्यान १० ते १२ अनोळखी व्यक्ती तोंडाला बांधून हातात तलवारी घेवून कार्यालयात अनाधिकृत घुसत कार्यालयाची तोडफोड केली. अभिलेख जाळले, काचा-फर्निचर तोडले, यात १ लाख ३० हजार रूपयांच्या शासकीय मालमततेचे नुकसान केले आहे.याप्रकरणी गणेश गंगाराम काळदाते (कनिष्ठ लिपिक) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही घटनेत १६ लाख ७७ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणाचा तपास फौजदार तानाजी चेरले करीत आहेत. हे अनोळखी हल्लेखोर कोण? याचा शोध लावण्याचे आव्हान बाळापूर पोलिसांपुढे उभे आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा