शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

२७ तलावांत १२ टक्केच जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 23:46 IST

जिल्ह्यात यंदा काही अल्प तर काही भागात अत्यल्प पर्जन्यमान झाले. धरणांतही जेमतेम तीन ते चार टक्के पाणी असून भूगर्भ पाणीपातळीही खालावत आहे. लघुपाटबंधारेच्या २७ तलावांचा उपयुक्त जलसाठाही आता १२ टक्क्यांवर आला आहे. विविध भागात पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत असताना प्रशासन मात्र केवळ आराखडे व सर्व्हे करण्यातच गुंतलेले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात यंदा काही अल्प तर काही भागात अत्यल्प पर्जन्यमान झाले. धरणांतही जेमतेम तीन ते चार टक्के पाणी असून भूगर्भ पाणीपातळीही खालावत आहे. लघुपाटबंधारेच्या २७ तलावांचा उपयुक्त जलसाठाही आता १२ टक्क्यांवर आला आहे. विविध भागात पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत असताना प्रशासन मात्र केवळ आराखडे व सर्व्हे करण्यातच गुंतलेले आहे.हिंगोली जिल्ह्याला लागून असलेल्या इसापूर, येलदरी व सिद्धेश्वर या तिन्ही धरणांची पाणीपातळी यंदा अत्यल्प आहे. यात येलदरी धरणात जीवंत साठा ३६.४९ दलघमी असून याची एकूण क्षमतेशी टक्केवारी ४.४९ आहे. सिद्धेश्वर धरणात २0.६५ दलघमी असून साठवणक्षमतेशी हे प्रमाण २५.५0 टक्के आहे. तर इसापूर धरणात जीवंतसाठा ३६.३५ दलघमी असून हे प्रमाण ३.७७ टक्के एवढे आहे.तर लघुपाबंधारेच्या तलावांपैकी हिंगोलीतील चोरजवळा-२२ टक्के, सवड-२९, पेडगाव-९, हातगाव-१, भाटेगाव -१ टक्के जलसाठा आहे. सेनगाव तालुक्यातील सवना-२२, पिंपरी-८, घोडदरी-५३ टक्के जलसाठा आहे. औंढा तालुक्यातील मरसूळ-२0, वाळकी-३६, सुरेगाव२९, पुरजळ-३, वंजारवाडी-३३, पिंपळदरी-२६ तर केळीत ३ टक्के जलसाठा आहे. कळमनुरी तालुक्यातील बोथी ४९ टक्के, दांडेगाव-३८, तर वसमत तालुक्यातील राजवाडी तलावात ५0 टक्के जलसाठा आहे. या प्रकल्पांची क्षमता ५४ दलघमीची असून पाणीसाठा मात्र ६.५६ दलामीच आहे.टंचाई वाढू लागलीसध्या ग्रामीण भागातून टंचाईची ओरड होत आहे. मात्र तरीही प्रशासनाने आतापर्यंत केवळ दोन ठिकाणी उपाययोजना केलेल्या आहेत. इतरांचे बेहाल आहेत.हिंगोली जिल्ह्यातील लघुपाटबंधारे विभागाच्या २७ तलावांतही अवघा दोन टक्के पाणीसाठा उरला आहे. यामध्ये हिंगोली तालुक्यातील पारोळा, वडद, हिरडी, सेनगाव तालुक्यातील बाभूळगाव, औंढा तालुक्यातील सेंदूरसना, केळी, कळमनुरी व देवधरी या तलावांचे पाणी जोत्याखाली गेले आहे.२७ लघुप्रकल्पांपैकी ९ जोत्याच्या खाली गेले. १४ प्रकल्पांत 0 ते २५ टक्के, २ प्रकल्पांत ५0 टक्क्यांच्या आत, तर उर्वरित दोन प्रकल्पांत त्यापेक्षा जास्त पाणीसाठा आहे. गतवर्षी याच दिवसांत २२.९९ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध होता.कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाºयांतही अल्पसाठा आहे. यात सेनगावात चिंचखेडा बंधाºयात 0.६१, हिंगोलीत खेर्डा बंधाºयात-0.५९, जिंतूरवच्या खोलगाडगा बंधाºयात 0.६१ व परभणीच्या रहाटीत १.२ दलघमी पाणी आहे.