शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

बघे होऊ नका...समाजभान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 23:54 IST

आजकाल रस्ते अपघातांची संख्या किती वाढली आहे? या आठवड्यात तर राज्यात दोन-तीन अपघात असे घडले की, त्यात प्रत्येकी दहाहून अधिकजण मृत्युमुखी पडले. दररोजचे वर्तमानपत्र उघडले की, अशा अपघातांच्या आठ-दहा बातम्या तरी सहज दिसतील.

ठळक मुद्देकेवळ काय झालंय एवढेच विचारून केवळ बघ्याची भूमिका घेऊ नका, तर मदतीला धावा.जखमीला पाहून विश्वजित तातडीने पुढे गेले. घरच्यांशी संपर्क साधला आणि थेट सीपीआर रुग्णालयात येण्यास सांगितले.

आजकाल रस्ते अपघातांची संख्या किती वाढली आहे? या आठवड्यात तर राज्यात दोन-तीन अपघात असे घडले की, त्यात प्रत्येकी दहाहून अधिकजण मृत्युमुखी पडले. दररोजचे वर्तमानपत्र उघडले की, अशा अपघातांच्या आठ-दहा बातम्या तरी सहज दिसतील. तुम्ही नियमित प्रवास करीत असाल तर तुम्हाला एखादा तरी छोटा-मोठा अपघात पाहावयास मिळत असेल. अशावेळी तुम्ही काय करता? अपघात पाहून थोडा वेळ थांबता. चूक कोणाची, कुणी गेले आहे का की केवळ जखमी आहेत, याची चौकशी तिथल्याच बघ्यांकडे करता? अपघात गंभीर असेल तर हळहळता की तसेच निघून पुढे जाता? अपघातातील जखमींच्या मदतीला जावे, त्यांना रुग्णालयात दाखल करावे, असे तुम्हाला वाटते का की पोलिसांची नसती ब्याद पाठीमागे नको म्हणून मनात असूनही तुम्ही काहीही करीत नाही? हे प्रश्न तुम्ही स्वत:लाच विचारा. आपण आजपर्यंत किती अपघातग्रस्तांना तातडीने मदत करून त्यांचा जीव वाचविला? याचे उत्तर सकारात्मक असेल तर तुमच्यातला माणूस जागा आहे, तुम्ही समाजसेवी आहात, असे समजायला हरकत नाही.

समाजातील माणुसकी, प्रामाणिकपणा कमी होत चालल्याची ओरड सार्वत्रिक आहे. मात्र, आजही माणुसकीचे दर्शन घडविणाºया घटना पाहायला मिळतात. आणि वाळवंटातही ओअ‍ॅसिस दिसल्याचा भास आपल्याला होतो. अशीच एक घटना स्वातंत्र्यदिनी कोल्हापुरात घडली. राजारामपुरीतील एक हॉटेल व्यावसायिक विश्वजित काटकर हे त्या दिवशी काही कामानिमित्त साताºयाला गेले होते. तेथील काम आटोपून ते रात्री कोल्हापूरला परत येत होते. सव्वानऊचा सुमार असावा. ते तावडे हॉटेल ओलांडून पुढे आले असता त्यांना रस्त्यात मोठी गर्दी दिसली. त्यांनी गाडी थांबविली. काय झाले हे पाहण्यासाठी ते खाली उतरले, तर तेथे मोठा अपघात झाला होता. तो पाहण्यासाठी जमलेल्या बघ्यांची ती गर्दी होती. एकजण रस्त्यावर रक्तबंबाळ होऊन बेशुद्धावस्थेत पडला होता. गर्दीतील कुणीतरी पोलिसांना फोन लावत होते, तर कुणी रुग्णवाहिकेला. कुणी अपघात कसा झाला, याची चर्चा करीत होते. त्या जखमीला पाहून विश्वजित तातडीने पुढे गेले. जखमीच्या शेजारी रस्त्यावर त्याचा मोबाइलही पडला होता. तो उचलून विश्वजित यांनी जखमीच्या घरच्यांशी संपर्क साधला आणि थेट सीपीआर रुग्णालयात येण्यास सांगितले. त्यानंतर त्या जखमीला स्वत:च्या गाडीत घातले आणि सीपीआर गाठले.

जखमीला रुग्णालयात दाखल करून त्या जखमीच्या घरचे तिथे येईपर्यंत थांबून मगच ते तेथून बाहेर पडले. त्या जखमीचे नाव होते अनिकेत आडसुळे. हातकणंगले तालुक्यातील मौजे वडगावचा रहिवासी. वेळीच रुग्णालयात दाखल केल्यामुळे अनिकेतचे प्राण वाचले. अमित कांदेकर यांनी त्यांच्या या मदतीची घटना फेसबुकवर ‘आम्ही कोल्हापुरी’ ग्रुपवर छायाचित्रासह पोस्ट केली. या पोस्टला सुमारे नऊ हजार लाइक्स आणि सतराशे कॉमेंट्स मिळाल्या आहेत. सर्वांनीच विश्वजित यांचे कौतुक आणि अभिनंदनही केले आहे. यावरून लोकांना समाजसेवा किती महत्त्वाची वाटते हे जाणवते. सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धूम सुरू आहे. अनेकांनी समाजप्रबोधनपर देखावे उभारून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे. अशीच जनजागृती अपघाताबद्दलही व्हावी. हेल्मेट वापरणे, वाहतुकीची शिस्त पाळणे, वेगमर्यादा पाळणे या गोष्टी वाहनचालकांसाठी महत्त्वाच्या आहेतच; पण त्याचबरोबर अपघातग्रस्तांच्या मदतीला तातडीने धाऊन जाणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे आता मदतीला धावणाºयांच्या पाठीमागे पोलिसांचे शुक्लकाष्ठही लागत नाही. त्यामुळे यापुढे एखादा अपघात दिसलाच तर केवळ काय झालंय एवढेच विचारून केवळ बघ्याची भूमिका घेऊ नका, तर मदतीला धावा. तुमच्यामुळे एखाद्या जखमीचा जीव वाचू शकतो याची जाणीव सदैव ठेवा.- चंद्रकांत कित्तुरे‘ङ्म’’ङ्म‘ें३स्र१ं३्र२ं@िॅें्र’.ूङ्मे