शहरं
Join us  
Trending Stories
1
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
2
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
3
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
4
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
5
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
6
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
7
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
8
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
9
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
10
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
11
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
12
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
13
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
14
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
15
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
16
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
17
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
18
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
19
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
20
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या

तुमचा फिटनेस ट्रेनर असू शकतो अर्ध्या हळकुंडानं पिवळा झालेला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 17:57 IST

ट्रेनर सर्टिफाइड आहे की नाही, हे तपासायलाच हवं..

ठळक मुद्देआपण ज्या जिममध्ये जातोय, तिथला ट्रेनर चांगला फिट दिसतोय, म्हणजे तो प्रशिक्षितच असेल हा समज आधी आपल्या डा्रेक्यातून काढून टाकायला हवा.ट्रेनरचं ज्ञान अद्ययावत असावं.पूर्वी जो व्यायाम उत्तम समजला जात होता त्यातले काही नंतर चुकीचे आणि घातक ठरवण्यात आले आहेत. या साºया बदलांची माहिती ट्रेनरला असायलाच हवी.

- मयूर पठाडेथोडा वेळ गेला तरी चालेल, पण ज्या व्यक्तीकडून आपण व्यायामाचे धडे घेणार आहोत, तो ट्रेनर योग्यच असायला हवा. नाहीतर पैसा आणि घाम गाळूनही पुन्हा आपल्या पदरी निराशाच येऊ शकते. ट्रेनर मग तो जिममधला असो, नाहीतर तुम्हाला घरी येऊन शिकवणारा खासगी ट्रेनर, त्याचं ज्ञान अद्ययावतच हवं.जिममध्ये जायला सुरुवात केल्यानंतर अनेक जण आपल्याला सरळ तिथल्या ट्रेनरच्या हवाली करून टाकतात. तो जे सांगेल त्यावर निमूटपणे विश्वास ठेवतात. अर्थात फिटनेस ट्रेनरचं ऐकायलाच हवं, पण तो जर योग्य प्रशिक्षित असला तर!आपण ज्या जिममध्ये जातोय, तिथला ट्रेनर चांगला फिट दिसतोय, म्हणजे तो प्रशिक्षितच असेल हा समज आधी आपल्या डा्रेक्यातून काढून टाकायला हवा. कारण आजही अनेक जिममध्ये प्रशिक्षित ट्रेनर नसतो. त्याऐवजी ज्यानं व्यायामाच्या बळावर आपली बॉडी कमावली आहे, एखाद-दुसºया जिममध्ये ट्रेनर म्हणून काम केलं आहे, त्यालाच ट्रेनर म्हणून नेमतात. असा ट्रेनर सर्टिफाइड असेलच असं नाही. सर्टिफाइड ट्रेनरनं काही लेखी आणि प्रॅक्टिकल टेस्ट दिलेल्या असतात. नामांकित संस्था ट्रेनरसाठी अशा परीक्षा घेतात आणि त्यानंतरच त्यांना ट्रेनरचं सर्टिफिकेट देण्यात येतं. थोडक्यात आपला ट्रेनर अल्प प्रशिक्षित, लेस स्क्ल्डि आणि अर्ध्या हळकुंडानं पिवळा झालेला नसावा.चांगल्या ट्रेनरचं ज्ञान अद्ययावत असावं. कारण अगदी व्यायामाच्या पद्धतीमध्येही संशोधनानंतर त्यातील काही पद्धती बंद करण्यात आल्या आहेत आणि त्या चुकीच्या ठरवण्यात आल्या आहेत. पूर्वी जो व्यायाम उत्तम समजला जात होता आणि ट्रेनर, व्यायामपटू आवर्जुन जो व्यायाम करायचे, त्यातले काही व्यायाम नंतर चुकीचे आणि घातक ठरवण्यात आले आहेत. या साºया बदलांची माहिती ट्रेनरला असायलाच हवी. त्यासाठी नियमितपणे त्यानं ट्र;ेनिंग घ्यायला हवं.काही जण ट्रेनर म्हणून तर काम करतात, पण टाइमपास म्हणून. त्यांचं ध्येय दुसरंच काहीतरी असतं, हा जॉब ते मनापासून करत नसतात आणि त्याविषयी त्यांना प्रेम, ममत्त्वही नसतं. असे ट्रेनर तुम्हाला आवश्यक ती माहिती देतीलच याची कोणतीच खात्री नाही.विशेषत: महिलांच्या बाबतीत धोक्याचा सल्ला म्हणजे काही ट्रेनर्स फ्लर्टही असू शकतात. त्यांच्यापासून लांबच राहायला हवं.