शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

तुम्हाला माहीत आहे, तुम्ही आणखी किती वर्षं जगाल? कधी येणार तुम्हाला मृत्यू?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2017 15:46 IST

‘गंमत’ नाही, तुमच्या आयुष्याची दोरी किती बळकट आहे हे आता संगणक ‘खात्री’नं सांगणार..

- मयूर पठाडे‘संपलं तुमचं आयुष्य. तुमच्या आयुष्यातली शेवटची पाच वर्षं आता उरली आहेत. एवढ्या काळात जे करायचं ते करून घ्या’, असं जर तुम्हाला कोणी सांगितलं तर?तुम्ही नक्कीच त्याला म्हणाल, भाऊ, हा काही हिंदी चित्रपट नाही कि त्याची स्टोरी. जे काही बोलायचं ते नीट आणि स्पष्ट बोल..तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण ही काही आता ‘गंमत’ राहिलेली नाही. तुम्ही खरंच अजून किती वर्षं जगाल, तुमच्या आयुष्याची नौका कधी पैलतीरी लागेल, हे बऱ्यापैकी ठामठोकपणे सांगू शकेल असं तंत्रज्ञान शास्त्रज्ञांनी विकसित केलं आहे. शास्त्रज्ञांनी आर्टिफिशिअल इन्टेलिजन्सच्या साहाय्यानं ही अशक्यातली गोष्ट जवळपास शक्य केली आहे.त्यासाठी कंम्प्युटर टेक्नॉलॉजीचीही मदत घेतली आहे. तुमच्या फोटो इमेजेस पाहून हा कॉम्प्युटर सांगू शकेल,तुमचं आयुष्य पाच वर्षांपेक्षा जास्त आहे की कमी!

 

या कंम्प्युटर भविष्यवाणीची अचूकता ६९ टक्के आहे. तरीदेखील हे संशोधन खूपच उपयुक्त मानलं जात असून त्यामुळे अशा रुग्णांच्या ‘टेलरमेड’ उपचारासाठी मोठी मदत होईल. आॅस्ट्रेलियाच्या अ‍ॅडलेड युनिव्हर्सिटीतील शास्त्रज्ञांच्या टीमनं ही करामत केली असून त्याचं हे संशोधन ‘सायंटिफिक रिपोर्ट्स’ या विज्ञानविषयक प्रसिद्ध जर्नलमध्ये नुकतंच प्रकाशित झालं आहे. अत्यंत मूलगामी असं हे संशोधन असलं तरी अजून अनेक गोष्टी गुलदस्त्यात असून त्यावर पुढील संशोधन सुरू आहे.

 

संगणकावरील या इमेजेस पाहून त्याचं कसं अ‍ॅनालिसिस करायचं हे या कंम्प्यूटर सिस्टिमला शिकवण्यात आलं आहे. रुग्णाचं आणि त्याच्या वेगवेगळ्या अवयवांचं आयुष्य किती हे अचूकपणे सांगणं हे सध्या तरी डॉक्टरांच्या आवाक्याबाहेर आहे, पण या संशोधनामुळे अशा रुग्णांवर त्यांना अधिक लक्ष देता येऊ शकेल आणि त्यांच्यावरील उपचाराची दिशाही निश्चित करता येऊ शकेल.

 

हे कंम्प्युटर प्रोग्रामिंग रुग्णाचे फोटो पाहून नेमकं कशाच्या आधारे तुमच्या आयुष्याची भविष्यवाणी वर्तवतो हे अजून स्पष्ट झालेलं नसलं तरीही शरीराच्या पेशीजालाला आलेल्या सुजेसारखे जुनाट विकार आणि रक्तसंचयामुळे हृदयात होणारे बिघाड यासारख्या विकारांवर ही संगणकप्रणाली खात्रीने तुमच्या आयुष्याची भविष्यवाणी वर्तवू शकते असं या शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. अलीकडच्या काळात हार्ट अटॅक आणि इतरही अनेक गंभीर विकारांच्या संदर्भातील रुग्णांबाबत त्यांच्या आयुष्याची दोरी किती बळकट आहे याची भविष्यवाणी हा संगणक वर्तवू शकेल. त्यामुळे अशा आजारांचं लवकर निदान होऊन या रुग्णांना वेळेवर औषधोपचार मिळेल आणि त्यांना जीवदान मिळू शकेल अशीही शास्त्रज्ञांना खात्री आहे.