शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

वेट लॉससाठी तुम्ही इतकी मरमर करताय, पण उपयोग काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 16:43 IST

तोंडाला पाणी आणणाऱ्या पदार्थांपासून नुसतं दूर राहून काही फायदा नाही..

ठळक मुद्देवजन वाढू नये यासाठी अनेक गोष्टींपासून आपण दूर राहतो, पण घात होतोच.विशेषत: आॅफिसमध्ये असे अनेक खाद्यपदार्थ आपल्या समोर येतात, जे आपल्याला मनापासून आवडत असतात.या पदार्थांपासून तुम्ही कटाक्षानं दूर राहिलात तरी त्यांनी घात केलेलाच असतो.

- मयूर पठाडेआपलं वजन आटोक्यात राहावं यासाठी आपण किती आग्रही असतो, त्यासाठी किती आटापिटा करतो.. वजनाच्या काट्यावर उभं राहिल्यावर काटा गरागरा फिरायला लागल्यावर पहिला धक्का जेव्हा बसतो, पोटाचा घेर वाढायला लागतो, तेव्हा अनेक जण अचानक ‘जागे’ होतात, अचानक त्यांना ‘किक’ बसते आणि ते चक्क व्यायामबियाम करायला लागतात, कॅलरी कॉन्शस होतात, खाण्यापिण्यावर बंधनं आणतात.. ज्यांच्यापासून पूर्वी आपण दूर राहू शकत नव्हतो, अशा सगळ्या फूड डिशही आपण टाळायला लागतो.. सगळं काही ताळ्यावर आलंय असं वाटायला लागतं, पण बºयाचदा आॅफिस घात करतं..ज्या ठिकाणी तुम्ही काम करीत असता, त्याठिकाणी बºयाचदा विकली बर्थडे सेलिब्रेशन्स होत असतात.. केकबिक आणलेला असतो.. आपण कितीही नाही म्हटलं तरी आपल्याला थोडा का होईना केक खावाच लागतो.. स्रॅक्सचा तर अनेकदा पूर आलेला असतो.. जेवणाआधीच्या वेळेत आणि बºयाचदा जेवणानंतरच्या वेळेत स्रॅक्स आॅफिसमध्ये येतं. कोणीतरी मागवतं.. हे सगळं पाहून आपल्यालाही काही वेळा ते खावंसं वाटतं. कारण मुळात आपल्याला मनापासून ते आवडतंच असतं.वेट लॉसच्या बाबतीत आपण अगदीच ‘कट्टर’ असलो, आवडणारी, तोंडाला पाणी सुटणारी कोणतीही गोष्ट समोर आली तरी आपण कटाक्षानं त्याला नकार देत असलो तरीही त्यानं व्हायचा तो घात होतोच. तुमच्या वेट लॉसच्या निर्धाराचे बारा वाजतात ते वाजतातच. यातलं तुम्ही काही म्हणजे काहीही खाल्लं नाही, तरीही.. कारण काही संशोधकांचं, अभ्यासकांचं तर म्हणणं आहे, हे पदार्थ तुम्ही खाल्ले नाही तरी तुम्ही ते खाल्ल्यासारखेच असतात! कारण आवडीचे हे पदार्थ नुसते समोर आल्यानंतर तुमच्या शरीरात जे स्त्राव निर्माण होतात ते आणि तुम्ही हे पदार्थ खरोखरच खाल्ल्यानंतर जे स्त्राव निर्माण होतात ते, सारखेच असतात! त्यामुळे तुम्ही हे पदार्थ खाल्ले नाही, तरी त्यानं फारसा फरक पडत नाही!त्यामुळे निदान आॅफिसमध्ये तरी या पदार्थांना आणि त्या वातावरणाला तुम्ही बळी पडणार नाही, याची काळजी घ्यायलाच हवी..