शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

World Homeopathy Day 2017 : होमिओपॅथी- एक संपूर्ण उपचार पद्धती !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2017 15:12 IST

वैद्यक शास्त्रातील अस्तित्वात असलेल्या उपचार पद्धतींपैकी आधुनिक व प्रभावी अशी होमिओपॅथी हे एक शास्त्र आहे.

-Ravindra Moreआज १० एप्रिल रोजी जागतिक होमिओपॅथीक दिवस सर्वत्र साजरा केला जात आहे. होमिओपॅथीचे जनक डॉ. सॅम्यूअल हॅनीमन यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो.वैद्यक शास्त्रातील अस्तित्वात असलेल्या उपचार पद्धतींपैकी आधुनिक व प्रभावी अशी होमिओपॅथी हे एक शास्त्र आहे. ज्याचा शोध डॉ. ख्रिश्चन फ्रेडरीक सॅम्यूअल हॅनिमन यांनी लावला. अगदी सामान्य कुटुंबात चीनी मातीच्या भांड्यांना रंग देणाऱ्या दांपत्याच्या घरी १० एप्रिल १७५५ रोजी डॉ. सॅम्यूअल हॅनीमन यांचा जर्मनीत जन्म झाला. हॅनिमन यांनी अगदी सामान्य परिस्थितीतून आपले बालपणीचे शिक्षण घेतले व पुढील शिक्षण पैसे नसल्याने इतर भाषांचे ज्ञान अवगत करुन विविध ग्रंथ दुसऱ्या भाषेत रुपांतरीत केले व आपले वैद्यकीय शिक्षण एम.डी.पर्यंत पुर्ण केले. त्यांनी अथक परिश्रम घेऊन सम: समं शमयंती या सिद्धांतानुसार होमिओपॅथी या नव्या वैद्यक शास्त्राचा शोध लावला. हे आधुनिक शास्त्र विकसित करताता डॉ. सॅम्यूअल हॅनीमन यांना खूपच समस्यांना तोंड द्यावे लागले. सुरुवातीच्या काळात सहकार्यांच्या त्रासामुळे त्यांना स्वत:चे घरदार सोडावे लागले त्यात त्यांच्या मुलाचा मृत्यू झाला. तरीही जिद्द व चिकाटीने रुग्णांवर अभ्यास करुन स्वत:वर व मित्रांवर प्रयोग करुन त्यांनी विविध होमिओपॅथी औषधी शोधून काढल्या व १७९६ साली होमिओपॅथी जगासमोर आणली. त्यांनी सुमारे ३० पेक्षा जास्त होमिओपॅथी ग्रंथ लिहिले. होमिओपॅथीच्या गुणकारी औषधामुळे रुग्ण मुळशपासून बरे होऊ लागले. त्यामुळे इतर डॉक्टरदेखील होमिओपॅथीचा अभ्यास करु लागले व होमिओपॅथीचा प्रचार व प्रसार होऊ लागला. काही वर्षातच डॉ. केंट, डॉ. बोरीक, डॉ. एलेन यांनीदेखील होमिओपॅथीचे ग्रंथ लिहिले व हळुहळु होमिओपॅथी संपूर्ण जगात प्रसिद्ध झाली.भारतात सर्व प्रथम पश्चिम बंगालमध्ये कलकत्ता येथे होमिओपॅथी उदयास आली. संपूर्ण जगात सर्वात जास्त भारतात होमिओपॅथीचे डॉक्टर्स आहेत. आज केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या मदतीने होमिओपॅथीचा राष्ट्रीय स्तरावर विकास झाला आहे. आज भारतात सुमारे १८९ होमिओपॅथी कॉलेज आहेत. त्यापैकी महाराष्ट्रात ४६ कॉलेज आहे. तसेच सुमारे ६० हजारपेक्षा जास्त नोंदणीकृत डॉक्टर्स महाराष्ट्रात आहेत. सध्याच्या उपचार पद्धतींपैकी होमिओपॅथी ही एक प्रभावी शास्त्र उपचार पद्धती आहे. होमिओपॅथीबाबत सांगायचे झाले तर सोरा, सिफीलीस व  सायकोसिस या तीन मायझम्स (त्रिदोष)च्या संतुलनात बिघाड होतो तेव्हा आजार निर्माण होतो, त्यावेळी सम: समं शमयंती या सिद्धांतानुसार व्यक्तीच्या लक्षणा स्वरुप सारखे होमिओपॅथीक औषध दिले जाते व या औषधाने तिनही ‘मायझम्स’मध्ये समन्वय साधला जातो. या समन्वयामुळे रोग प्रतिकार क्षमता वाढते व आजार आपोआप समुळ नष्ट होतो. होमिओेपॅथी उपचार पद्धतीमध्ये औषध निवडताना सर्वप्रथम रुग्णाची वैयक्तिक माहिती घेतली जाते. ज्यात रुग्णाची शारीरिक व मानसिक लक्षणे, विचार, सवयी, आयुष्यातील महत्त्वपूर्ण घटना व त्या घटनांचा रुग्णांच्या मनावर कोणकोणत्या स्वरुपात परिणाम झाला व रुग्ण घटनेचा कसा विचार करतो या सारखी बरीच लक्षणे विचारात घेतली जातात. होमिओपॅथी ही खूप लवकर, कमी वेळात रुग्णाला बरी करणारी उपचार पद्धती आहे. बरे होण्यास लागणारा वेळ हा त्या आजारावर अवलंबुन आहे. उदा. थंडी, ताप, जुलाब, पोटदुखी अशा अवस्थेत होमिओपॅथीने थोड्याच वेळात आजार संपूर्णपणे घालविता येतो. परंतू गंभीर, आजार जिर्ण झाल्यावर आजाराची गुंता वाढल्यावर रुग्ण आल्यास ती गुंता सोडविण्यास थोडा वेळ लागतो. होमिओपॅथीने आज टॉन्सिलायटीस, अ‍ॅपेंडीसायटीस, किडनी स्टोन, मुळव्याध, भगंदर, गर्भाशयाच्या गाठी यासारखे अनेक शस्त्रक्रिया करावे लागणारे आजार कोणतीही शस्त्रक्रिया न करता बरे केले जातात. तसेच आजार परत उद्भवू नयेत म्हणूनही प्रतिबंधात्मक उपाययोजना केली जाते. या उपचार पद्धतीत अगदी लहान बाळापासून वृद्धांपर्यंत सर्वांना सर्व आजारांवर औषध घेण्यास सोपे आहे. या उपचार पद्धतीचे वैशिष्ट्ये म्हणजे ‘व्हायटल फोर्स’ म्हणजेच चेतना शक्तीला उत्तेजना दिली जाते. अशा या आधुनिक होमिओपॅथीचा प्रचार व प्रसार झाल्यामुळे रुग्णांचा कल प्रचंड प्रमाणात वाढला आहे. विशेष म्हणजे आज सर्दी, खोकल्यापासून कॅन्सरपर्यंत आजार असलेले रुग्ण होमिओपॅथी उपचार घेत आहेत.                                                                                                                                                                 - डॉ. नरेंद्र प्र. सोनार                                                                                                                                                                  एम.डी. होमिओपॅथीAlso Read : ​तरुणांच्या समस्यांवरील होमिओपॅथी उपचार पद्धती