शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
3
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
4
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
5
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
8
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
9
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
10
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
11
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
12
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
13
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
14
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
15
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
16
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
17
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
18
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
19
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
20
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय

World Heart Attack Day: तरुणींमध्ये वाढले हार्ट अटॅकटचे प्रमाण, 'या' गोष्टी ठरतात कारणीभूत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2021 15:08 IST

आपल्या आजूबाजूलाही आपण अशी अनेक उदाहरणं ऐकतो, वाचतो, पाहतो की अगदी ऐन तिशी-चाळिशीतल्या व्यक्तींचाही हार्ट अटॅकमुळे अचानक मृत्यू होतो. त्यातच आता तरुणी आणि महिलांमध्येही हृदयरोगाचा (Heart Attack in Young Women) धोका वाढत चालला आहे. कमी वयातच महिलांना हृदयविकार होण्याची वेगवेगळी कारणं असू शकतात.

हृदय (Heart) हे आपल्या शरीराचं इंजिन आहे. या इंजिनाचं वैशिष्ट्य असं आहे, की ते कधीच विश्रांती घेत नाही. त्यामुळे त्याची योग्य पद्धतीने काळजी घेण्याशिवाय आपल्याला कोणताही पर्याय नाही. याबद्दल जनजागृती करण्यासाठी २९ सप्टेंबर रोजी जागतिक हृदय दिन अर्थात World Heart Day साजरा केला जातो. आजच्या काळातली आपली जीवनशैली अशी विचित्र आहे, की भारतातल्याच नव्हे तर जगभरातल्या तरुणांना हृदयरोगाचा असलेला धोका झपाट्याने वाढतो आहे. आपल्या आजूबाजूलाही आपण अशी अनेक उदाहरणं ऐकतो, वाचतो, पाहतो की अगदी ऐन तिशी-चाळिशीतल्या व्यक्तींचाही हार्ट अटॅकमुळे अचानक मृत्यू होतो. त्यातच आता तरुणी आणि महिलांमध्येही हृदयरोगाचा (Heart Attack in Young Women) धोका वाढत चालला आहे. कमी वयातच महिलांना हृदयविकार होण्याची वेगवेगळी कारणं असू शकतात, असं वैद्यकीय तज्ज्ञांचं म्हणणं आहे. 'एनडीटीव्ही'ने याबद्दलची माहिती प्रसिद्ध केली आहे.

पूर्वी व्यसनाधीन महिलांचं प्रमाण खूप कमी होतं. आताच्या काळात मात्र अनेक तरुण महिलांना सिगारेट (Cigarettes) किंवा दारूचं व्यसन (Alcoholism) असल्याचं पाहायला मिळतं. जास्त प्रमाणात मद्यपान करणं, तसंच सिगारेट्स ओढणं हे तरुण वयातच महिलांमध्ये हृदयविकार होण्यास, हार्ट अटॅक येण्यास आमंत्रण देण्यासारखं आहे.

तरुणींना हार्ट अटॅक येण्याचं प्रमुख कारण लठ्ठपणा हे देखील आहे. डॉक्टर्स वारंवार सांगतात, की लठ्ठ व्यक्तींमध्ये दृदयविकाराच्या झटक्याचा धोका वाढतो. कारण लठ्ठपणामुळे उच्च रक्तदाबाचा त्रास होतो. त्यातून हृदयविकार जडू शकतो. त्यामुळे महिलांनी लठ्ठपणा नियंत्रित होण्यासाठी प्रयत्न करणं अत्यावश्यक आहे.

पुरेशी झोप न घेणं हेदेखील हृदयविकाराचं कारण ठरू शकतं. कारण झोप पुरेशी झाली नाही, तर रक्तदाबावर वाईट परिणाम होतो. रक्तदाबात बिघाड झाला, तर हृदयविकार होऊ शकतो. त्यामुळे महिलांनी किमान सात ते आठ तास झोप नियमितपणे घेणं गरजेचं आहे.

डायबिटीस (Diabetes) हेदेखील हृदयविकाराचं प्रमुख कारण आहे. डायबिटीसमुळे किडनीसोबतच हृदयावरही विपरीत परिणाम होतो. गेल्या दशकापासून मधुमेहग्रस्त महिलांच्या संख्येत मोठी वाढ नोंदवली गेल्याचं डॉक्टर्स सांगतात. मधुमेहामुळे मेटाबॉलिक अ‍ॅबनॉरमॅलिटीज होतात आणि त्यामुळे तरुण महिलांमध्ये हृदयविकाराचा धोका वाढतो.

ताण अर्थात स्ट्रेस (Stress) हे हृदयविकाराच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे. ताणामुळे रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस निर्माण होऊ शकतात. त्यामुळे रक्तप्रवाहात अडथळे निर्माण होतात आणि त्यातून हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. त्यामुळेच तणावरहित राहण्याचा किंवा ताण हलका करण्याचा प्रयत्न महिलांनी कायम करावा, असा सल्ला दिला जातो.

गर्भनिरोधक गोळ्या अर्थात काँट्रासेप्टिव्ह पिल्स जास्त प्रमाणात घेणं हेदेखील तरुण महिलांना हृदयविकार होण्याचं एक प्रमुख कारण आहे. कारण या गोळ्यांमुळे हॉर्मोन्सवर विपरीत परिणाम होतो. हॉर्मोन्सची पातळी बदलली, तर रक्तदाब बदलू शकतो. त्यामुळे महिलांच्या हृदयावर अधिक ताण येऊ शकतो. या पिल्स जास्त प्रमाणात घेतल्यामुळे महिलांच्या रक्तात गुठळ्याही होऊ शकतात. तसं झालं तर हृदयविकाराचा धोका वाढतो. त्यामुळे तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय या गोळ्या घेऊ नयेत.

आजची जीवनशैली (Lifestyle) हे हृदयविकाराचं सर्वांत मोठं कारण आहे. वेळेवर न जेवणं, कम्प्युटरसमोर कित्येक तास बसून राहणं, शारीरिक हालचाली आणि व्यायामाचा अभाव या सगळ्यामुळे हळूहळू हृदयाचे स्नायू कमजोर होतात. ते हृदयविकाराचं प्रमुख कारण आहे. तसंच, अन्य अनेक विकारही यामुळे होतात. या सगळ्या बाबी लक्षात घेऊन तज्ज्ञांच्या सल्ल्याने तरुणींनीच नव्हे, तर सर्व वयोगटातल्या स्त्री-पुरुषांनी आपली जीवनशैली सुधारावी आणि तशी अंमलबजावणी करावी. त्यामुळे हृदयविकार दूर राहायला मदत होईल.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सHeart Attackहृदयविकाराचा झटकाHeart Diseaseहृदयरोग