शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

व्यायाम कराल कि डाएटवर कंट्रोल ठेवाल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 17:37 IST

वजन कमी करण्यासाठी यातली एक तरी गोष्ट निवडावीच लागेल..

ठळक मुद्देवजन कमी करण्याचे दोन मुख्य मार्ग. पहिला मार्ग म्हणजे व्यायाम करायचा आणि दुसरा मार्ग म्हणजे डाएट कंट्रोल करायचा.‘व्यायाम आपल्यानं बापजन्मात होणार नाही’, अशी तुमची भूमिका असेल तर मग त्याच्यापाठी धावूही नका. त्यापेक्षा सरळ डाएटचा मार्ग पकडा.‘अमूक एक खाणंपिणं सोडणं मला या आयुष्यात जमायचं नाही’, असं जर तुमचं म्हणणं असेल तर डाएटच्या फारशा फंदात पडू नका.आपल्या ध्येयापासून आपण ढळणार नाही, ध्येयासाठी आपल्याला प्रोत्साहन मिळत राहील अशा गोष्टींचा शोध घ्या..

- मयूर पठाडेवजन कमी करायचंय.. म्हटलं, तर ही फार मोठी गोष्ट आहे आणि म्हटलं तर अतिशय सोपी. आजपर्यंत हजारो, लाखो लोकांनी आजवर वजन कमी करण्याची प्रतिज्ञा केलीय, पण त्यापैकी फारच थोड्या लोकांना आपलं उद्दिष्ट पूर्ण करता आलंय, पण त्याचवेळी असेही हजारो, लाखो लोक आहेत, ज्यांनी वजनाला आपल्या मुठीत ठेवण्याचं आपलं उद्दिष्ट अगदी सहजपणे पूर्ण केलंय. त्यासाठीचे त्यांचे उपाय मात्र हटके होते आणि त्याला ते चिटकूनही राहिले.तुम्हालाही तुमचं वजन कमी करायचं असेल, तर फार अवघड नाही ते. योग्य मार्ग मात्र त्यासाठी वापरले पाहिजेत.काय कराल?१- वजन कमी करण्याचे दोन मुख्य मार्ग. पहिला मार्ग म्हणजे व्यायाम करायचा आणि दुसरा मार्ग म्हणजे डाएट कंट्रोल करायचा. अरबट चरबट काहीही खायचं नाही.२- वजन कमी करायला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही कोणत्या प्रकारचे व्यक्ती आहात ते अगोदर तपासून पाहा. म्हणजे ‘व्यायाम आपल्यानं बापजन्मात होणार नाही’, अशी तुमची भूमिका असेल तर मग त्याच्यापाठी धावूही नका. त्यापेक्षा सरळ डाएटचा मार्ग पकडा.३- पण जर ‘अमूक एक खाणंपिणं सोडणं मला या आयुष्यात जमायचं नाही, त्यापेक्षा काय व्यायाम करायचा असेल तो सांगा’, असं जर तुमचं म्हणणं असेल तर डाएटच्या फारशा फंदात पडू नका.४- आपण कोणत्या प्रकारचे व्यक्ती आहोत हे एकदा कळल्यानंतर आपल्या ध्येयापासून आपण ढळणार नाही, ध्येयासाठी आपल्याला प्रोत्साहन मिळत राहील अशा गोष्टींचा शोध घ्या.. मग ते तुमचे मित्र असतील किंवा फॅमिली मेंबर किंवा आणखी कुणी..५- नेहेमी पॉझिटिव्ह विचार करा. म्हणजे काहीही झालं तरी मला ते जमेलच, यावर विश्वास ठेवा. त्याबरोबर शिस्त, पेशन्स आणि कठोर परिश्रम.. या गोष्टी असल्यात तर यश तुमच्या खिशात आहे समजा.६- तुम्ही कोणत्याही प्रकारचे व्यक्ती असलात, तरी काकडी आणि लिंबूवर्गीय फळं तर तुम्ही खाऊच शकता. तुम्हाला ते वजनाच्या काट्याबाहेर फारसं जाऊ देणार नाही!