शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

​आता होईल गोड खाण्याची इच्छा कमी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2016 15:28 IST

एक विशिष्ट प्रकारचा बॅक्टेरिआ गोड आणि कॅलरीयुक्त पदार्थ खाण्याच्या आपल्या इच्छेवर नियंत्रण ठेवतो.

गोड खायला कोणाला आवडत नाही? समोर चॉकलेट, केक, आईसक्रीम पाहून प्रत्येकाचीच जीभ चळवळायला लागते. पण शरीरात साखरेचे प्रमाण वाढणे म्हणजे विविध आजारांना खुले निमंत्रण.हे सर्व माहित असून गोड खाण्याचा मोह आवरणे कठिण असते. यावर उपाय म्हणून वैज्ञानिकांना आपल्या पोटात तयार होणारा एक विशिष्ट प्रकारचा बॅक्टेरिआ शोधून काढण्यात यश आले जो गोड आणि कॅलरीयुक्त पदार्थ खाण्याच्या आपल्या इच्छेवर नियंत्रण ठेवतो.इम्पेरिअल कॉलेज लंडन आणि ग्लास्गोव्ह विद्यापीठातील संशोधकांनी वीस स्वयंसेवकांना मिल्कशेक पिण्यासाठी दिले. यांपैकी काही मिल्केशकमध्ये इन्युलिन-प्रोपायोनेट मिसळलेले होते. पिल्यानंतर सर्वांचे ‘एमआरय’ स्कॅन करत असताना त्यांना सलाद, मासे, विविध भाज्या, चॉकलेट, केक आणि पिझ्झासारखे काही कमी तर काही जास्त कॅलरीयुक्त पदार्थांचे फोटो दाखवण्यात आले.यावेळी असे दिसून आले की, इन्युलिन-प्रोपायोनेट असलेले मिल्कशेक पिलेल्या लोकांच्या मेंदूमधील  कौडेट आणि न्युक्ल्युएस अक्क्युम्बेन्स भागात फार कमी अ‍ॅक्टिव्हिटी होती. खाण्याची इच्छा उत्पन्न करणारा हा भाग असतो. फोटोपाहून खाण्याची इच्छा किती तीव्र होती असे विचारले असता त्यांनी अधिक कॅलरीयुक्त पदार्थांना सर्वात कमी पसंती दिली.वरिष्ठ संशोधक गॅरी फ्रॉस्ट यांनी माहिती दिली की, या अध्ययनातून हे स्पष्ट होते की, विशिष्ट प्रकारचे बॅक्टेरिआ सपलमेंट वापरून आपण गोड व कॅलरीयुक्त पदार्थांच्या सेवनाचे प्रमाण कमी करू शकतो, जे की आरोग्यासाठी खूप लाभदायक ठरेल.