शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

WHO Director in Gujarat: डब्ल्यूएचओ प्रमुख उद्या गुजरातला येणार; नरेंद्र मोदींची भेट घेणार, विविध कार्यक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2022 22:54 IST

भारतामध्ये झालेल्या कोरोना बळींच्या चुकीच्या मोजणी पद्धतीवरून वाद उद्भवलेला असतानाच डॉ. टेड्रोस अधनोम घेब्रेसियस भारत दोऱ्यावर येत आहेत. 

कोरोना व्हायरस महामारीच्या सुरुवातीला चीनवरून वादाच्या भोवऱ्यात सापडलेले डब्ल्यूएचओचे प्रमुख डॉ. टेड्रोस अधनोम घेब्रेसियस उद्यापासून तीन दिवस गुजरातच्या दौऱ्यावर आहेत. भारतामध्ये झालेल्या कोरोना बळींच्या चुकीच्या मोजणी पद्धतीवरून वाद उद्भवलेला असतानाच ते भारत दोऱ्यावर येत आहेत. 

महत्वाचे म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील गुजरात दौऱ्यावर आहेत. मोदींसोबत घेब्रेसियस काही कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत. घेब्रेसियस १८ एप्रिलला राजकोटला येणार आहेत. यानंतर ते जामनगरमध्ये मोदींची भेट घेतील. इथे पारंपरिक औषधांचे डब्ल्यूएचओकडून जागतिक केंद्र सुरु केले जाणार आहे. या इमारतीचा कोनशिला ठेवली जाणार आहे. 

राजकोटचे जिल्हाधिकारी महेश बाबू यांनी रविवारी सांगितले की, GCTM हे पारंपारिक औषधांसाठी जगातील पहिले आणि एकमेव जागतिक केंद्र असेल. घेब्रेयसस गुरुवारी गांधीनगरला जाणार आहेत. याचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होईल. आयुष गुंतवणूक आणि शिखर परिषदेचे उद्घाटन करण्यात येणार आहे. राजकोटचे महापौर प्रदीव दाव म्हणाले की, मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जगन्नाथ हे देखील सोमवारी राजकोटला पोहोचतील. येथे त्यांचे विमानतळावर सांस्कृतिक कार्यक्रमांनी स्वागत करण्यात येणार आहे. त्यांच्या सन्मानार्थ विशेष सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. 

कोरोना बळींचा नेमका आकडा किती? भारतात कोरोनामुळे मरण पावलेल्या लोकांचा अधिकृत आकडा 5.20 लाख आहे. तर, WHO च्या अंदाजानुसार, या महामारीमुळे देशात 40 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. हा अहवाल समोर आल्यानंतर वाद निर्माण झाला आहे. या आकडेवारीवरून काँग्रेसने केंद्रावर प्रश्न उपस्थित केले आहेत. 

टॅग्स :World health organisationजागतिक आरोग्य संघटनाNarendra Modiनरेंद्र मोदीGujaratगुजरात