शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

तुम्ही कुणामुळे जास्त आनंदी आहात? दोस्तांमुळे की कुटूंबामुळे?

By admin | Updated: June 8, 2017 18:30 IST

आनंदी जगणं आणि उत्तम आरोग्य यांच्यासाठी कुटूंबापेक्षाही जास्त महत्वाचे ठरतात दोस्त.

- नितांत महाजनआपल्याला सगळ्यांना आनंदी रहायचं असतं. पण आपला आनंदी कितीही नाही म्हटलं तरी इतरांवरच अवलंबून असतो. तो तसा ठेवू नये हे आपल्याला कळतं, पण वळत नाही. आणि वळून उपयोगही नसतो अनेकदा कारण आपल्या अवतीभोवतीची माणसं आपल्या सुखदु:खाला कारण ठरत असतातच. पण तुम्हाला विचारलं की तुमच्या जगण्यात कुणामुळे जास्त आनंद आहे. कोण जास्त रंग भरतं तुमच्या जगण्यात? दोस्त की कुटूंब? प्रश्न सोपा आहे, उत्तर तितकं सोपं नाही. पण तरी मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटीने केलेल्या एका अभ्यासानुसार काही लाख लोकांना असं वाटतं की, कुटूंबापेक्षा मित्रांमुळे आपण जास्त आनंदी होतो. मित्र आपल्या आयुष्यात अनेक आनंद भरतात आणि जगण्याला उमेद देतात.मिशिनग स्टेट युनिव्हर्सिटीने केलेल्या अभ्यासानुसार हे अत्यंत वेगळे आणि बदलत्या नातेसंबंधांवर प्रकाश टाकणारे एक नवे चित्र समोर आहे आहे. हेल्थ अ‍ॅण्ड हॅपिनेस या विषयांत विविध अभ्यास करणाऱ्या इथल्या संशोधकांनी २,७१,००० लोकांशी संपर्क केला. त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधत काही प्रश्नावल्या भरुन घेतल्या. त्या साऱ्या माहितीचे संकलन अर्थात डाटा प्रोसेसिंंग करण्यात आलं. आणि त्यातून काही निष्कर्ष काढण्यात आले.हा अभ्यास असं म्हणतो की, तरुण वयात मित्रांचा शब्द प्रमाण असतोच. मित्र आयुष्यात कुणाही पेक्षा अधिक महत्वाचे असतातच. मात्र वय वाढतं, प्रौढ होत जातात लोक तसतसे मित्रांचे महत्व आयुष्यात जास्त वाढते. वय वाढतं तशी ही मैत्री, त्याकाळातले निवडक, गिनेचूने मित्र जास्त महत्वाचे होत जातात. याकाळात सोबत चांगले मित्र असतील तर जगण्याचे, वाढत्या वयाचे पठारावस्था अधिक सोपी आणि आनंदी होते. ज्यांच्या वाट्याला असे मित्र येत नाहीत ते अधिक एकेकटे, कडवट आणि आतून जास्त कोरडे होत जातात.

 

मित्र चांगले असतील तर वाढत्या वयात माणसं आनंदी तर राहतातच पण त्याच काळात त्यांची तब्येतही चांगली राहते.मित्र कधी साथ देतात.१) क्रॉनिक आजार असेल, मोठा आजार स्वत:ला किंवा घरात कुणाला झाला तर मित्र जास्त साथ देतात.२) एक फील गूड आपल्या अवतीभोवती कायम ठेवतात.३) अवघड परस्थितीत साथ सोडत नाहीत.४) कठीण परिस्थितीत मदतीला धावतात. धीर देतात.५) फक्त दोष न देत राहता, उपाय सुचवतात.६) हेवेदावे न करता, साथ देतात.७) त्यांच्याशी शेअरिंग सोपं होतं,मिळालेल्या माहितीचं ते राजकारण करत नाहीत.